शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

अश्वत्थामा यात्रेकरुंची भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या तीन दिवसापासून सातपुडय़ाच्या तिस:या रांगेत भरलेल्या अश्वत्थामा यात्रेचा सामारोप रविवारी शहरातील हनुमान मंदिराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या तीन दिवसापासून सातपुडय़ाच्या तिस:या रांगेत भरलेल्या अश्वत्थामा यात्रेचा सामारोप रविवारी शहरातील हनुमान मंदिराच्या दर्शनानंतर करण्यात आला. या वेळी  हजारो यात्रेकरू यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेकरूंनी डफ-ताशांच्या गजरात वाजत-गाजत व नाचत मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता केली. ऐन पावसाळ्यात यात्रेकरू मोठय़ा श्रद्धेने बेधुंद होऊन ठेका घेत होते. डफ-ताशांच्या गजरात आणि ‘सिग्गरवाले बाबां’च्या जयघोषाने तळोदानगरी दुमदुमली होती. दरम्यान, यात्रकरूंबरोबरच भाविकांच्या गर्दीने बाजारपेठही गजबजली होती.समुद्र सपाटीपासून साधारण चार हजार फुट उंचीवर असलेल्या सातपुडय़ातील तिस:या रांगेतील अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवास धनत्रयोदशीपासून सुरूवात झाली होती. यात्रेचा प्रारंभ व समारोप मुख्यता तळोदा शहरातूनच केला जात असल्याने यंदाही रविवारी यात्रेकरूंनी शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर सांगता केली. तत्पूर्वी नेहमी प्रमाणे यात्रेच्या समारोपाच्या आदल्या दिवशी यात्रेकरूंनी शहरातील आणि बाजूच्या शेत मळ्यात मुक्काम केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी कॉलेज रस्त्यावरील चौफुलीपासून मिरवणुकांना सुरूवात करण्यात आली. या वेळी एका मागून एक डफ-ताशांनी वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या वेळी यात्रेकरूंनी राम-लक्ष्मण-सीतासह विविध प्राण्यांची सोंगे घेऊन वाद्याच्या तालावर ठेका धरून भर पावसात बेधूंद नाचत होते.तब्बल दीड किलोमीटर पावेतो मिरवणुकीच्या रांगा लागल्या होत्या. ताशांचा गजर आणि सिग्गर वाले बाबाच्या जयघोषाने तळोदा नगरी डुमडुमली होती. सलग आठ नऊ तास मिरवणुका चालल्या होत्या. यात्रे करूंच्या मिरवणुका पाहण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली हेाती. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते गर्दीचे तोबा फुलले होते. शहराची बाजारपेठदेखील गजबजली होती. मिरवणुकांमुळे पोलिसांनी मेनरोड, बाजारपेठकडील वाहतूक बंद केली होती.  मात्र किरकोळ व्यावसायिक लॉरीधारकांनी मनमानीपणे रस्त्याच्या मधोमध लॉ:या उभ्या केल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांच्या अनियंत्रणाबाबत यात्रेकरूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यंदा प्रथमच यात्रेच्या समारोपावेळी यात्रेकरूंनी सजवलेला अश्व आणला होता. या अश्वानेही ताल धरल्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. समारोपाची शोभायात्रा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने तळोदा शहरात आल्याने शहराला यात्रेचे स्वरुप आले होत़े 

स्वयंसेवी संस्थांकडून भोजन प्रसादी

यंदाही काही स्वयंसेवी सनस्थांनी यात्रोत्सवातील यात्रेकरू व भाविकांसाठी भोजनप्रसादाचे नियोजन केले होते. प्रसादासाठी स्टॉलवर मोठी झुंबड उडाली होती. याशिवाय ठिक-ठिकाणी व्यावसायिकांनी पाण्याचे ड्रमदेखील ठेवले होते. शहरवासियांच्या मदतीचा हात पाहून यात्रेकरूही भारावले होते. दरम्यान, निवडून आलेले शहादा-तळोदा मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांनी यात्रेकरूंच्या प्रत्येक विजर्सन मिरवणुकीस भेट देऊन यात्रेकरूंचा उत्साह वाढविला होता. या वेळीही त्यांचे कार्यकर्ते सोबत होते.