सायबर क्राईमबाबत विद्याथ्र्याना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:51 PM2019-08-03T12:51:25+5:302019-08-03T12:51:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आजची तरुणाई मोबाईलचा दुरुपयोग व अतिवापरामुळे मानसिक अपंगत्वाकडे जात आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळायला ...

Guidance for students on cybercrime | सायबर क्राईमबाबत विद्याथ्र्याना मार्गदर्शन

सायबर क्राईमबाबत विद्याथ्र्याना मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आजची तरुणाई मोबाईलचा दुरुपयोग व अतिवापरामुळे मानसिक अपंगत्वाकडे जात आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळायला हवा, असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी केले. ते यशवंत महाविद्यालयातील सायबर सेलबाबतच्या मार्गदर्शन वर्गाप्रसंगी बोलत होते. 
यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नंदुरबार पोलीस दलातर्फे सायबर सेल पुणे या  संदर्भात मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी महाविद्यालयीन विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, प्रा.डी.एस. नाईक, प्रा.शैलेंद्र पाटील, प्रा.राजेंद्र शेवाळे, प्रा.आरती तवर, प्रा.पंकज पाटील प्रा.एन.एस. पाटील, प्रा.योगेश चौधरी प्रा.जयश्री भामरे आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमासाठी प्रा.संजय मराठे, प्रा.शीतल दोडे, प्रा.के.डी. बंजारा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मयुर ठाकरे तर आभार प्रा.वाय.डी. चौधरी यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Guidance for students on cybercrime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.