लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर : शहरातील मंगलदास पार्क भागात पालिकेने निर्जंतुकीकरण केले असून परिसरातील २०० वर लोकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात आली. दरम्यान, सोमवारपासून बाजारपेठेची वेळ बदलण्यात आल्याची माहिती आढावा बैठकीतून देण्यात आली.शहरातील ६५ वर्षीय वृध्द महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासन गतीमान झाले आहे. मंगलदास पार्कचा तो परिसर सील करुन लगतचा परिसर कंटेन्टमेंट झोनमध्ये परावर्तीत करण्यात आला. तहसीलदार सुनीता जºहाड यांच्या दालनात अधिकारी व लोकप्रतिनिधी तथा व्यापारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व व्यापारी या बैठकीत सहभागी झाले. शहरातील मंगलदास पार्कमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले असून शहराच्या संपूर्ण भागात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवार व रविवार नवापूर बंदची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आल्याच्या अनुषंगाने शहरात त्याचे तंतोतंत पालन झाले.सोमवारपासून बाजारपेठेची वेळ पूर्ववत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत असेल, असे आढावा बैठकीत जाहीर करण्यात आले. मंगलदास पार्कमधील त्या वृद्धेच्या घरातील व सुरत येथे घेऊन गेलेला वाहन चालक अशा आठ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे व परिसरातील ५६ घरांमधील २०० वर नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. शहरात प्रवेश होणाऱ्या सर्व ठिकाणी पोलीस व गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असून शहरात ये-जा करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी दिली. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासन विविध उपाययोजना हाती घेत असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुनीता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सहकाºयांनी केले आहे.
नवापुरात २०० जणांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:30 PM