खाकीतील माणसांनी जपली माणूसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:25 PM2019-10-29T12:25:49+5:302019-10-29T12:25:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरात फिरणा:या वेडसर व्यक्तीस अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आधार देत दिवाळीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरात फिरणा:या वेडसर व्यक्तीस अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आधार देत दिवाळीच्या दिवशी त्याला अंघोळ करुन देत कपडे आणि फराळ दिला़ पोलीस कर्मचा:यांनी स्वत: त्या वेडसर व्यक्तीची आंघोळ करुन देत जपलेल्या अनोख्या माणूसकी धर्माची शहरात चर्चा सुरु आह़े
अक्कलकुवा शहरात काही दिवसांपासून एक वेडसर व्यक्ती फिरत असल्याचे वेळोवेळी शहरवासियांच्या नजरेस पडत आह़े कोणीही काळजी घेणारे नसल्याने वाढलेली दाढी, डोक्याचे केस, अंगावर फाटलेले कपडे आणि अनेक दिवसांपासून पाण्याचा स्पर्शही न झालेला नसल्याने त्याचा मूळ चेहरा हा पूर्णपणे काळाकीट्ट झाला होता़ रविवारी अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी पोलीस ठाण्यात आणून न्हाव्याला बोलावून डोक्यावरील केस व वाढलेली दाढी काढून दिल़े वर्षभरापासून मळलेले कपडे घालणा:या त्याची साबणाचे अंघोळ घालून नवीन कपडेही दिल़े
त्या निराधाराला मिठाई देत दिवाळीच्या दिवशी पोलीस निरीक्षक डांगे यांनी तोंडही गोड करुन दिल़े यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, योगेश्वर बुवा, शुभम भंसाली , पोलीस कॉन्स्टेबल संदीप महाले, रविंद्र साळवे, होमगार्ड राजेश तंवर, मनोज गुलाले, बापू राठोड आदी उपस्थित होते.
अक्कलकुवा शहरातून जाणा:या ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर भणंग अवस्थेत फिरणा:यांची संख्या मोठी आह़े अशा व्यक्तींना पोलीस ठाण्याकडून वेळावेळी मदत करण्यात येत आह़े गेल्यावर्षीही अक्कलकुवा पोलीस ठाण्याने एकाची मदत करत त्याला घरार्पयत पोहोचवले होत़े
शहरातील इतरही बेवारस अवस्थेत फिरणा:या वेडसर व्यक्तींवर पोलीसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून वेळावेळी त्यांची विचारपूस करण्यात येत आह़े