अपूर्ण कर्मचा-यांमुळे उत्पन्नावर परिणाम : शहादा एस.टी. आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:28 PM2018-02-19T17:28:01+5:302018-02-19T17:28:14+5:30

अपूर्ण कर्मचा:यांमुळे उत्पन्नावर परिणाम

Impact on income due to incomplete employees: Shahada ST Poster | अपूर्ण कर्मचा-यांमुळे उत्पन्नावर परिणाम : शहादा एस.टी. आगार

अपूर्ण कर्मचा-यांमुळे उत्पन्नावर परिणाम : शहादा एस.टी. आगार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारात कर्मचारी संख्या खूपच कमी असल्याने आगाराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अपूर्ण चालक-वाहकांमुळे बसेसच्या नियोजित फे:यांवरही परिणाम झाल्याने एस.टी.चे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत.
एकेकाळी धुळे विभागात उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असणारे शहादा आगार अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे मागे पडला आहे. शहादा आगारास 242 चालकांची गरज असताना फक्त 172 चालक आहेत तर 242 वाहकांची गरज असताना 188 वाहक आहेत. त्यातही दररोज आठ ते दहा चालक-वाहक नैमित्तीक रजेवर असल्याने जेमतेमच चालक-वाहकांवर शहादा आगाराचा प्रवास सुरू आहे.
आगारातील चालक-वाहकांच्या कमतरतेबरोबरच भरीसभर म्हणून शहादा आगारातून सुटणा:या आणि चांगले उत्पन्न देणा:या लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद करण्यात आल्याने प्रवाशांच्या गैरसोयीसोबतच आगाराचे उत्पन्नही कमी झाले आहे. शहादा-परळी, शहादा-सुरत, शहादा-औरंगाबाद या चांगले उत्पन्न देणा:या फे:या वरिष्ठांकडून बंद करण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे चालणारी शहादा-मुंबई रातराणीही गाडीदेखील बंद करण्याचा घाट घातला जात आहे तर दुसरीकडे प्रवासी संघटनेकडून मागणी होवूनही शहादा-जेजुरी, शहादा-अक्कलकोट, शहादा-बोरीवली, शहादा-अंबाजी या लांबपल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यात आलेल्या नाही. या गाडय़ा सुरू झाल्यास आगाराच्या उत्पन्नात निश्चित भर पडू शकते.
शहादा आगारातील 14 बसेस स्कॅब स्थितीत असूनही सेवत आहेत. आगारास गेल्या तीन वर्षात एकही नवीन बस न मिळाल्याने आगाराचा गाडा जुन्याच गाडय़ांवर सुरू आहे.
शहादा आगारात पार्क्ीगची समस्या असून, दुचाकी लावण्यासाठी जागा नसल्याने बसस्थानकावर येणा:या नागरिकांना जागे मिळेल तेथे मोटारसायकल उभी करत असल्याने प्रवाशांना व बस चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. आगारातर्फे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विशेषत: उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहादा बसस्थानकात नगरपालिकेचे नळ कनेक्शन आहे. या कनेक्शनचे आगाराकडून नगरपालिका दरवर्षी पाणीपट्टीही वसूल करते. मात्र नळकनेक्शन नेमके कुठे आहे याची माहितीही आगारातील अधिका:यांना नाही. मिळालेल्या माहितीनुसार बसस्थानकाजवळील एक व्यावसायिक गेल्या 15 वर्षापासून हे नळ कनेक्शन वापरीत असल्याचे समजते.

Web Title: Impact on income due to incomplete employees: Shahada ST Poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.