ढगाळ हवामानामुळे रब्बीवर परिणाम : तळोदा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:36 PM2017-12-09T12:36:39+5:302017-12-09T12:36:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गहुचीही वाढ खुंटली आह़े ढगाळ वातावरण लवकर न निवळल्यास रब्बी पिकांना बुरशीयुक्त रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकार शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़े
ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका निर्माण होत आह़े रांझणी परिसरात मोठय़ा प्रमाणात गहु व हरभ:याची पेरणी करण्यात आली आह़े त्यामुळे आसमानी संकटामुळे पिकांची हानी झाल्यास शेतक:यांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आह़े
गहू, हरभरा पिकाची वाढ खुंटली
अवकाळी पाऊस तसेच ढगाळ हवामानामुळे गहु, हरभरा पिकांची वाढ खुंटली आह़े त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आधीच परिसरात थंडीचा जोर उशीराने वाढला असल्याने शेतक:यांनी हरभरा पेरणीला विलंब केला होता़ त्यातच ‘ओखी’ वादळामुळे पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आह़े त्यानंतर पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही़ परिणामी पिकांची वाढ जोमात होत नसल्याच्या व्यथा शेतक:यांकडून संगण्यात येत आह़े त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत़
मजुर टंचाईची समस्याही गंभीर
एकीकडे आसमानी तर दुसरीकडे सुलतानी संकट शेतक:यांना छळत असल्याची स्थिती आह़े रब्बी हंगामाला ढगाळ हवामानाचे ग्रहण लागले असतानाच दुसरीकडे शेतीकामांसाठी मजुरांचीही टंचाई जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े गुजरात राज्यात मजुरांचे स्थलांतर झाले असल्याने स्थानिक शेतीकामे करण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत आह़े
सूर्यप्रकाशाची आवश्यकता
अवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले असून किडीचाही प्रादुर्भाव आह़े गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आह़े त्याच सोबत पुरेसा सुर्यप्रकाशही मिळत नसल्याने रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े