रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:22+5:302021-07-19T04:20:22+5:30

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचा पदग्रहण समारंभ येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आला. पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रीक्ट ...

Inauguration Ceremony of Rotary Club of Nandurbar | रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचा पदग्रहण समारंभ

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचा पदग्रहण समारंभ

Next

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचा पदग्रहण समारंभ येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आला. पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संतोष प्रधान, सुनेत्रा प्रधान, असिस्टंट गव्हर्नर रवींद्र पाटील, अहिंसा फाउंडेशनचे चेअरमन राजेश मुनोत, यशवंत स्वर्गे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष पंकज पाठक यांच्याकडून नीरज देशपांडे यांनी अध्यक्षपदाचा तर जयंती देशपांडे यांनी सचिवपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी संचालक मंडळावर हिरालाल महाजन, दिनेश वाडिले, विलास दाणेज, नेहा गुजराती, रोहित केतकर, छाया कोडग, राजेंद्र कासार, नीलेश देसाई, हितेश सुगंधी, अनिल पाटील यांनीही पदभार स्वीकारला. नूतन जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनीही आधीच रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे मानद सदस्यत्व स्वीकारले आहे. प्राचार्य डॉ. एन.डी. चौधरी, डॉ. रोशन भंडारी, डॉ. शिल्पा भंडारी, संतोष नानकाणी, सुशील पंडित, डॉ. रोहन शाह, रणजीत राजपूत, मुकेश सूर्यवंशी, नीलेश सोनार, प्रीती सोनार, सुवर्णा सोनार, संदीप श्रॉफ, रोहिणी श्रॉफ, मयूर शहा यांचे सदस्यत्व स्वीकारून रोटरी क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले. संतोष प्रधान यांनी समाजाला आपल्याकडून काय फायदा झाला ते महत्त्वाचे असून समाजासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सर्वांनी मिळून एकत्रित राबवावे, असे आवाहन केले. नीरज देशपांडे यांनी वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनिल अग्रवाल यांनी केले. माधुरी पाठक यांनी फोर वे टेस्टचे वाचन केले. जयंती देशपांडे यांनी आभार मानले.

Web Title: Inauguration Ceremony of Rotary Club of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.