राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:40 PM2020-01-04T12:40:55+5:302020-01-04T12:41:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले़ गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष आहे़ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कल्चरल अॅकडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले़
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापूर्वी दोन तर उद्घाटनानंतर आठ अशा दहा एकांकिका दिवसभरात सादर झाल्या़ एकांकिकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यभरातून आलेल्या कलावंतांचे कौतूक केले़ उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, उद्योजक शितलभाई पटेल, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, डॉ.चेतन चौधरी, प्रभाकर भावसार, मिरा मनोहर आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करण्यात येऊन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ कार्यक्रमात बोलताना मनोज रघुवंशी यांनी सांगितले की, जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमुळे महाराष्ट्र राज्याच्या नाट्य चळवळीत नंदुरबारचे नाव कोरले गेले आहे़ या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यचळवळीला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे़
यावेळी नाटककार तथा स्पर्धेचे परीक्षक रविंद्र लाखे यांनी सांगितले की, जिभाऊ करंडक राज्यस्तरीय स्पर्धेत सातत्य ठेवल्यास नक्कीच नंदुरबार येथून कलावंत व नाट्य तंत्रज्ञ उदयास येतील. नंदुरबारात ९ वर्षांपासून सातत्याने सुरु असलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे़ प्रास्ताविक नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार एन.टी.पाटील यांनी मानले. या स्पधेर्चे परिक्षण नाटककार रविंद्र लाखे, नाट्यलेखक दत्ता पाटील, नाटककार अजित भगत हे करीत आहेत. यशस्वीतेसाठी जिभाऊ करंडक आयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत़
दिवसभरात स्नेहयात्री प्रतिष्ठान (भुसावळ) यांच्याकडून ‘वारी जावा’, मॅड स्टुडीओ (धुळे)-रात्र वैराची आहे, जनायक थिएटर्स (जळगांव)- करंट छबी, समर्थ बहुउद्देशीय संस्था (एरंडोल)- लाल चिखल, प्रताप महाविद्यालय (अमळनेर) असणं-नसणं, सिद्धांत बहुउद्देशीय संस्था (धुळे)- नेकी, लोकमंगल कलाविष्कार (धुळे)-कात, नूतन मराठा महाविद्यालय (जळगांव)-हलगी सम्राट या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले़ शनिवारी १० एकांकिाकांचे सादरीकरण होणार आहे़ एकुण दहा एकांकीकेचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेत एकूण २१ संघांनी सहभाग नोंदवला असून त्यांच्याकडून सादर होणार कलाकृती पाहण्यासाठी पे्रक्षक गर्दी करत आहेत़