सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:18 PM2018-07-12T12:18:04+5:302018-07-12T12:18:17+5:30

जनजागृती गरजेची : पाच वर्षात दीड हजार जणांना सर्पदंश, पावसाळ्यात समस्या

Increasing graph of snakebite incidents | सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

Next

नंदुरबार : गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विशेष म्हणजे वर्षागणिक हा आकडा वाढत जात असल्याचे चित्र समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आह़े यात, सर्पदंशाच्या घटना विशेषत ग्रामीण भागात, शेतशिवारात अधिक घडत असल्याचे निरीक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आह़े 
2013 पासूनच्या सर्पदंशाच्या घटनांची आकडेवारी बघता, वर्षनिहाय यात वाढ झाल्याचे दिसून येत आह़े वर्षनिहाय सर्पदंशाच्या घटना पुढील प्रमाण - 2013-2014  189, 2014-2015 288, 2015-2016  306, 2016-2017 317, 2017-2018 335 तर एप्रिल-मे 2018 या दोन महिन्यात 25 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत़ अशा प्रकारे गेल्या पाच वर्षात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झालेला आह़े 
सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये साप, इंगळी, विंचू आदी प्राणी जमिनीबाहेर पडत असतात़ त्यातच पावसाळ्यात शेक:यांची खरिप हंगामाची पेरणी, मशागत आदी शेती कामे जोमात असतात़ त्यामुळे शेतशिवारात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडताना दिसून येत असतात़ परंतु या घटनांची संख्या वर्षागणिक वाढतच असल्याने ही बाब चिंतेची ठरत आह़े 
जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण होतात दाखल
जिल्ह्यातील अक्कलकुवा तसेच धडगाव आदी तालुक्यांमधील दुर्गम भागात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात आल़े आधीच जंगली परिसर असल्याने या ठिकाणी सर्पाचा मोठय़ा संख्येने सुळसुळाट असतो़ त्यातच                या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची घरेसुध्दा उंचावर नसून जमिनीलगतच लाकडी बांबू, कौले आदींपासून बनवलेली असल्याने याठिकाणी घरात प्रवेश करणे सरपटणा:या जनावरांसाठी सहज सोपे असत़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी पथदिवे तसेच वीजेचा अभाव असल्याने अंधारात सर्पदंश होण्याच्या घटना अधिकच वाढताना दिसून येत           आह़े 
जनावरांनाही होताय सर्पदंश
मनुष्यासह गोठय़ात बांधलेल्या गाय, बैल, बकरी आदी पाळीव जनावरांनाही सर्पदंश होऊन जनावरे दगावण्याच्या घटना दुर्गम भागात घडत असतात़ पशु दगावल्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत असत़े 
जनजागृतीची आवश्यकता
दुर्गम भागात सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती किंवा माहिती नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारंपारिक उपचार पध्दतीने उपचार घेण्यास प्राधान्य देत असतात़परंतु यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असत़े त्यामुळे आरोग्य विभागाकडून याची दखल घेत सर्पदंश झाल्यावर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती करणे गरजेचे आह़े
रुग्णवाहिकांअभावी अडचणी
पावसाळी दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना समोर येत असतात़ सर्पदंशाचे रुग्ण जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असतात़ परंतु अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना नेण्याची वेळ येत असत़े परंतु काही वेळा रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असतात़ 
लवकर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यताही नकारता येत नाही़
त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आह़े 
 

Web Title: Increasing graph of snakebite incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.