ऊसावर पांढ_या माशीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 08:43 PM2019-01-31T20:43:13+5:302019-01-31T20:43:17+5:30
तळोदा : यंदाच्या अत्यंल्प पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची अतिशय नाजूक अवस्था आह़े ...
तळोदा : यंदाच्या अत्यंल्प पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची अतिशय नाजूक अवस्था आह़े तालुक्यातील ऊसावर तर पांढ:या माशीचा प्रादुर्भाव झाला आह़े
एकेकाळी तळोदा तालुक्यात पाण्याची पातळी 40 ते 50 फुटावर होती़ त्यामुळे तालुकाही सुजलाम् सुफलाम् होता़ परंतु अलीकडच्या 10 ते 12 वर्षापासून वर्षागणिक पाण्याची पातळीत घट होत असल्याचे दिसून येत आह़े यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच शेतक:यांचे कृषीपंप कमकुवत होण्यास सुरुवात झाली होती़
आता तर ते पूर्णत: निकामी झालेत़ त्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची नाजूक अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आह़े तळोदा शहरानजीक तलावडी शिवारातील एका शेतात उसाचे पिक पाण्याअभावी पूर्ण सुकून गेल्याने तो कडब्यासारखा भासत आह़े
वास्तविक पीक मोठे करण्यासाठी शेतक:यांनी प्रचंड खर्च केला होता़ सदर पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी कृषी पंपच बंद झाल्यामुळे पीकदेखील वाया गेले आहेत़ गेल्या वर्षी पाण्याच्या पातळी अभावी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े मुबलक पाणी नसल्याने केळी, पपई या पिकांचे क्षेत्र तर अत्यल्प असल्याचे शेतकरी सांगतात़ दरम्यान, गहू व हरभराच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आह़े या पिकांना पोषक असणारी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे पिकांची स्थितीही चांगली असल्याचे शेतकरी म्हणतात़ यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लावणी केलेल्या उसावर सध्या व्हाईट फ्लॉय माशीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे उसाची वाढच थांबली आह़े साहजिकच शेतकरी औषध फवारणी करुन मेटाकुटीस आला आह़े या माशीच्या आक्रमणामुळे उसाची पाने कुरतडली जात आहेत़ परिणामी त्याची वाढदेखील खुंटली आह़े
एकीकडे पाण्याअभावी कसे-बसे सुनियोजन करुन शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्नात असताना दुसरीकडे सदर माशीच्या प्रादुर्भावामुळे पीक नष्ट होत आह़े कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेतक:यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे अशी शेतक:यांची मागणी आह़े