नदीत बांध घालून ‘पाणी जिरवा’ अभियान
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: August 19, 2017 12:29 PM2017-08-19T12:29:17+5:302017-08-19T12:29:42+5:30
शहादा तालुक्यात लोकसहभाग : नांगरटी करून पात्रात केला जातोय पाण्याचा निचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
परिवर्धे/ब्राrाणपुरी : गेल्या चार वर्षापासून पजर्न्यमान व भूजल पातळीत घट झाल्याने शहादा तालुक्यात शेतक:यांना समस्या येत आहेत़ यावर मात करण्यासाठी परिवर्धे येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत नदीत बांध घालून वाकी नदीचे खोलीकरण केले आह़े ब्राrाणपुरी येथेही खोलीकरणाचे काम सुरू आह़े
आठ दिवसांपूर्वी परिवर्धे गावातील 14 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी पात्रात नांगरटी करण्यात आली होती. यामुळे नदी पात्रातील वरचा थर निघून पात्रात दीड हजार फूट अंतरात ठिकठिकाणी आडवे बांध टाकण्यात येवून खोलीकरण करण्यात येत आह़े नांगरटीमुळे भुसभुशीत झालेल्या नदीपात्रात आडवे बांध टाकण्यात आल्याने पात्रात पाण्याचा निचरा होत आह़े या प्रकल्पासाठी शासनाकडून कुठल्याही मदतीची वाट न पाहता परिवर्धे गावातून वर्गणी करण्यात आली आह़े उपक्रमामुळे शेतक:यांचा कुपनलिकांमध्ये बारमाही पाणी राहून बागायत शेतीचा विकास होण्यास सर्वाधिक मदत होणार आह़े या प्रकल्पासाठी परिवर्धे जलसंधारण समिती गठित करण्यात आली होती. परिसरातील औरंगपूर येथेही नदी पात्राची पाहणी करून तेही असाच उपक्रम गावातील नदीच्या पात्रात राबविणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी भगवान चौधरी, ईश्वर पाटील, मोहन पाटील, इंजि. डी.एच. पाटील, भरत पाटील, कैलास पाटील, नीलेश पाटील, राजाराम पाटील, गुलाल पाटील, कोळदा, ता. नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे कल्पेश पाडवी, उमेश शिंदे, जयंत उत्तरवार यांचे मार्गदर्शन लाभत आह़े
गेल्या वर्षी लोकसहभागातून ब्राrाणपुरी येथील शेतक:यांनी सुसरी नदीपात्रात नांगरटी केली होती़ त्यामुळे कुपनलिका व विहिरींच्या पातळीत वाढ झाली होती. दुष्काळ मुक्तीसाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या संकल्पना वापरून पाणी बचतसाठी प्रय} करण्यात येत आहे. परंतु येथील ग्रामस्थांनी शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ न घेता स्वखर्चाने सुसरी नदीपात्रात 10 ते 15 फुटाचे जेसीबीद्वारे खड्डे करून पाणी अडविण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे ब्राrाणपुरी परिसरातील एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील जमिनीला त्याचा फायदा होणार आहे. या उपक्रमासाठी शेतकरी व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे आपापला सहभाग नोंदवित आहे.