जिल्ह्यात पावसाच्या हजेरीने खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:39 PM2019-10-23T12:39:10+5:302019-10-23T12:39:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात पावसाने दिलेल्या हजेरीमुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत़ मंगळवारी दुपारपासून पावसाला ...

Kharif threatens with presence of rain in district | जिल्ह्यात पावसाच्या हजेरीने खरीप धोक्यात

जिल्ह्यात पावसाच्या हजेरीने खरीप धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात पावसाने दिलेल्या हजेरीमुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत़ मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती़ हाताला आलेले उत्पादन वाचवण्यासाठी शेतकरी दुपारपासून शेतशिवारात ठाण मांडून होत़े दरम्यान जिल्ह्यात रात्री पावसाचा जोर वाढल्याने शेतक:यांचा घास हिरावला जाण्याची भिती आह़े जिल्ह्यात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली़  
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील न्याहली परिसरात दुपारी तीन वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती़ सुमारे 1 तास हा पाऊस सुरु होता़ यातून बाजरी, भूईमूग, ज्वारी या ़पिकांना मोठा फटका बसला़ न्याहली, आसाणे, घोटाणे, खोक्राळे, भादवड आणि बलदाणे या गावांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला होता़ पावसामुळे या भागातून वाहणा:या अमरावती नदीला पूर येऊन बलदाणे येथील अमरावती नाला प्रकल्पाच्या साठय़ातही वाढ झाली आह़े दुपारी चार वाजेर्पयत पाऊस सुरु असल्याने खळवाडय़ा तसेच शेतात कापणी करुन ठेवलेले धान्य उचलण्यासाठी शेतक:यांची धावपळ उडाली होती़ पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी हताश झाले होत़े या भागात सायंकाळीही ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतक:यांनी उपाययोजनांना वेग दिला होता़ दरम्यान सायंकाळी सहा वाजेपासून नंदुरबार शहरात पावसाला सुरुवात झाली होती़ सुमारे पाऊण तास झालेल्या रिपरिप पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता़ तालुक्यातील पूर्व भागासोबतच पश्चिम पट्टय़ातील धानोरा येथे पाच वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली़ पावसामुळे कापसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आह़े पश्चिम पट्टय़ातील पिंपळोद, करणखेडा, परिसरातील गावांमध्ये सायंकाळी रिपरिप पाऊस सुरु होता़ रात्री उशिरा पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती़ 
तळोदा
तालुक्यातील मोड, रांझणी, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन परिसरात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आह़े यातून मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती़ मुसळधार पावसामुळे कापूस, ज्वारी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल़े तालुक्यातील बोरद परिसरात दुपारी 2 वाजता मुसळधार पाऊस झाला़ या पावसामुळे कापूस पिक खराब होण्याची शक्यता आह़े कापसाचे बोंड खराब होऊन उत्पादन खराब येण्याची भिती असल्याने शेतकरी हवाल दिल झाले होत़े बोरद परिसरात काही ठिकाणी मिरचीची लागवडीही करण्यात आली होती़ पावसामुळे उत्पादन धोक्यात आले आह़े तसेच काही शेतक:यांनी लागवड केलेल्या टरबुजालाही पावसाचा धोका असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ 
शहादा
तालुक्यातील सारंगखेडा परिसरात दुपारी 3 वाजेपासून पाऊस सुरु झाला होता़ दीड तास कोसळलेल्या पावसामुळे शेतक:यांची खरीप पिके पाण्यात गेल्याचे सांगण्यात येत आह़े रात्री पुन्हा ढगाळ वातावरण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आह़े बामखेडा परिसरातील तापी काठालगतच्या गावांमध्ये दुपारी 4 वाजता पावसाने हजेरी लावली़ यामुळे कापसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े शहादा शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपासून रिमङिाम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती़ रात्री उशिरार्पयत रिमङिाम पाऊस कोसळत होता़ यातून गारवा निर्माण होऊन थंडीतही वाढ झाली होती़ तालुक्याच्या उत्तरेस म्हसावदसह परिसरातील गावांमध्येही पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाल्याची माहिती आह़े ब्राrाणपुरी येथेही पावसाने हजेरी दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होत़े शेतशिवारातील नुकसानीची स्थिती बुधवारी समोर येणार आह़े 


नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात लागवड करण्यात आलेल्या मिरचीचे यंदा विक्रमी उत्पादन येणार असल्याची शक्यता आह़े परंतू दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि मंगळवारी कोसळलेला पाऊस यामुळे उत्पादन खालावून मिरची खराब होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े अनेक ठिकाणी मिरचीचा तोडा करुन उघडय़ावरच साठा करुन ठेवला होता़ सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने मिरची खराब झाल्याचे सांगण्यात येत आह़े शहरातील मिरची पथारींवर टाकलेली मिरचीही पावसामुळे खराब होऊन काळी पडण्याची भिती व्यापा:यांकडून व्यक्त होत आह़े 

शहादा तालुक्यातील परिवर्धे परिसरात दुपारी 3 वाजेपासून मुसळधार पाऊस झाला़ यात पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आह़े रात्री उशिरार्पयत परिसरात पावसाची रिपरिप होत होती़ परिवर्धे ते शहादा दरम्यानच्या गावांमध्ये मंगळवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवार जलमय झाले होत़े पावसामुळे केळी आणि पपईलाही धोका असल्याने शेतकरी उपाययोजनांसाठी शेतशिवारात थांबून होत़े दरम्यान काढणी केलेले पीक सुरक्षित करण्यासाठीही शेतक:यांच्या उपाययोजना सुरु असल्याचे दिसून आल़े पावसामुळे नदीनाल्यांच्या पाण्यातही वाढ झाली होती़  

ंसततच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या ज्वारी पीकाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आह़े  पावसामुळे कापणी, मळणी, लांबत असल्याने ज्वारीचे कणीस काहीसे काळसर पडत असल्याचेही दिसून येत आहे.

Web Title: Kharif threatens with presence of rain in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.