लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/रायखेड/असलोद : शहादा तालुक्यात पावसाने वादळवा:यासह जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणखेडा, असलोद, रायखेड परिसरात ऊस, मका, मिरची, केळी, कापूस आदी काढणीवर आलेल्या पिकांचे वादळामुळे नुकसान झाल्याने शेतक:यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.ब्राrाणपुरी व भागापूर परिसरातऊस व मका पिकाचे नुकसानगेल्या आठवडाभरापासून ब्राrाणपुरी व भागापूर परिसरातील नागरिक उकाडय़ाने त्रस्त झाले होते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाडय़ापासून सुटका मिळाली असली तरी ऊस व मका पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भागापूर येथील शेतकरी हेमंत छोटूलाल पाटील यांचा पाच एकर व काशीनाथ नरोत्तम पाटील यांचा चार एकर ऊस वादळामुळे पूर्ण जमीनदोस्त झाला. ब्राrाणपुरी शिवारात मका पिकाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र मुसळधार वादळी पावसाने या पिकालाही आडवे केले आहे. वादळाने शेतक:यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतक:यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून फक्त पाहणी होत असल्याने शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पावसामुळे सुसरी नदीला पूर आला होता.रायखेड परिसरगेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक बनत चालली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. शहादा-खेतिया मार्गावर वाहन चालकांनी मिळेल त्या जागेवर आपली वाहने थांबवून पाऊस उघडल्यानंतर पुढे मार्गस्थ झाले. हा पाऊस शेतक:यांना फायदेशीर ठरणार असल्याचे मत जाणकार शेतक:यांनी व्यक्त केले. लोणखेडालोणखेडा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात रविवारी सर्वात जोराचा पाऊस झाला. वादळवा:यामुळे विद्याविहारजवळ लोणखेडा येथील नगीन काळू पाटील यांच्या शेतातील ऊस पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने त्यांचे नुकसान झाले. इतर शेतक:यांच्या ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले. कापूस, मिरची, केळी, पपई या पिकांचेही वादळामुळे नुकसान झाले.असलोद परिसरातही नुकसानअसलोद परिसरात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा या भागात शेतक:यांनी उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे. मात्र वादळी पावसामुळे ब:याच शेतक:यांचे ऊस पिक पूर्णपणे आडवे पडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रकाश रघुनाथ पाटील, भटू गुलाबराव पाटील, अजय चंद्रसिंग गिरासे, दीपक सरदारसिंग गिरासे, मीना संजय कदम, नाना रावजी मराठे यांच्या शेतातील उसाचे पीक वादळामुळे जमीनदोस्त झाले आहे. तसेच तिधारे, कलमाडी व असलोद शिवारातही उसासह इतर पिकांचे नुकसान झाले. तलाठी एस.एस. राठोड यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केला.पंचनामे करण्याची मागणीशहादा तालुक्यात विविध ठिकाणी वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिका:यांनी पंचनामे करण्याचे आदेश काढून नुकसानग्रस्त शेतक:यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.
ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:13 PM