ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:06 PM2018-12-29T13:06:35+5:302018-12-29T13:06:39+5:30
थंडीचा परिणाम : सातपुडा परिसरात गोठवणारी थंडी, शेकोटीचा आधार
सोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुडा परिसरात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आह़े गुरुवारी सायंकाळपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती़ किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने ग्रामीण भागात उब मिळवण्यासाठी ग्रामस्थ शेकोटय़ांचा आधार घेत आहेत़
दरम्यान परिसरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी सुसाटय़ाने वाहणा:या शीतलहरींमुळे थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील परिसरातील नागरिक वाढत्या थंडीने गारठले आहे.
उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वा:यांमुळे मागील तीन दिवसात सातपुडा परिसरात थंडीत वाढ झालेली दिसून येत आह़े याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आह़े दुर्गम भागात शरीर गोठवणारी थंडी निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच सकाळ व रात्री ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून येत आह़े थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळवत आह़े
गेल्या पंधरवाडय़ापासून थंडीची लाट कायम आह़े त्यामुळे साहजिकच रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत असल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतशिवारासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वृद्धांची प्रकृतीदेखील खालावत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, थंडीत वाढ होत असल्याने साथरोगांची भितीदेखील वाढली आह़े त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठय़ा संख्येने गर्दी होताना दिसून येत आह़े
ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवून थंडीपासून बचाव करण्यात येत आह़े वाढत्या थंडीमुळे विद्याथ्र्याना शाळेत जाण्यास मोठय़ा प्रमाणात अडचणी येत आहेत़ अनेक विद्याथ्र्याच्या शाळा सकाळच्या सत्रात भरत आह़े त्यामुळे भर थंडीत विद्याथ्र्यांना सकाळी शाळेत जाणे जिकीरीचे ठरत आह़े ग्रामीण भागात सायंकाळी लवकर शुकशुकाट होत असतो़ त्यामुळे दुपारच्या सत्रात भरणा:या शाळादेखील लवकर सोडण्यात याव्या अशी मागणी आह़े बहुतेक ठिकाणी विद्याथ्र्याना शाळा तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी गावापासून दूर अपडाऊन करावे लागत असत़े त्यामुळे त्यांना घरी येत रात्री उशिर होत असल्याने शाळा, महाविद्यालयांनी आपआपल्या वेळेत बदल करावा अशी मागणी जोर धरु लागली आह़े