एकांकिकांमधून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:37 PM2020-01-04T12:37:28+5:302020-01-04T12:37:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात नाट्य चळवळ रुजविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य एकांकिका स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी ...

Light on social issues from singularities | एकांकिकांमधून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

एकांकिकांमधून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात नाट्य चळवळ रुजविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य एकांकिका स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी नऊ प्रयोग सादर करण्यात आले. या एकांकिकांमधून खºया अर्थाने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारे, शेतकरी मुलांच्या व्यथा मांडणारे दृश्य दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सुरु असलेल्या जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेसाठी राज्यातून संघ दाखल झाले आहे़ विविध २१ नाट्यसंस्थांनी नोंदणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून स्पर्धेला प्रारंभ झाला़ पहिल्या दिवशी नऊ एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यात सकाळच्या सत्रात वारी जावा, रात्र वैºयाची हाय, करट छबी, रंग बावरी, लाल चिखल, असणं-नसणं, नेकी, कात, हलगी सम्राट यांचा समावेश आहे. बहुतांश एकांकिकांमधून कलाकार सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत असल्याचे जाणवले होते़ एकांकिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडता त्यांच्या कुटूंबांची व्यथा अधोरेखित करण्यात आली़
वारी जावा
स्रेहयात्री प्रतिष्ठा भुसावळ यांनी वारी जावा या एकांकिकेतून तुटत चाललेले नाते संबंध दाखविण्यात आले असून एका वारकरी परिवारात वाढलेली मुलगी व पिता हा दरवर्षी वारीला जातो. त्याने मुलीला जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले असून स्वत:च जीवनसाथीही निवडला. परंतु हे नातं टिकविण्यासाठी प्रयत्नच करण्यात आले नाही. नातं टिकवण्याऐवजी तोडण्यासाठी टोकाची भूमिका घेतली जाते. ही बाब व्यक्त करण्यात आली. स्रेहयात्रीने चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर पहिल्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती़
रात्र वैºयाची आहे
मॅड स्टुडिओ धुळे यांनी स्पर्धेतील दुसरी एकांकिकका सादर केली़ रात्र वैºयाची आहे या एकांकिकेतून त्यांनी महिलांवर होणारे अत्याचर, सुरक्षितता या विषयावर भाष्य केले़ अनैसर्गिक तत्त्वातील भूत ही संकल्पना पुढे आणून आत्म्याच्या तोंडून रात्री बेरात्री महिलांनी बाहेर पडू नये याबाबत त्यांच्याकडून चर्चा करण्यात आली़ एकांकिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला़
करट छबी
उद्घाटनानंतर जननायक थिएटर्स जळगाव यांनी करट छबी ही एकांकिका सादर केली़ मावी वृत्तीचे कंगोरे सांगणारी ही एकांकिका प्रकाश योजना आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी झाली होती़
लाल चिखल
स्पर्धेच्या दुपारसत्रात समर्थ बहुउद्देशीय संस्था एरंडोल यांनी सादर केलेल्या ‘लाल चिखल’ या एकांकिकेने गाजवला़ सुप्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव यांच्या लाल चिखल या कथेचा आधार घेत सादर केलेली ही एकांकिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली़ कलावंतांचा अभिनय आणि तांत्रिक बाबी यामुळे या सत्रातील पहिला वन्समोअर या एकांकिकेला मिळाला आहे़ पायाने टमाट्यांवर नाचणाºया ‘बा’ भूमिकेने उपस्थितांच्या ह्रदयाचा ठाव घेतला होता़
असणं-नसणं
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या संघाने यंदाही स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे़ त्यांनी असणं-नसणं ही एकांकिका सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले़ पुरुषी अहंकारातून निर्माण होणारे मतभेद आणि इतर कौटूंबिक बाबींवर भाष्य करताना प्रकाश योजना आणि संगीताचा वापर त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाची साक्ष देत होती़
महात्मा गांधी महाविद्यालय, चोपडा यांची रंग बावरी, सिद्धांत बहुउ्ददेशीय संस्था धुळे यांची नेकी, लोकमंगल कलाविष्कार धुळे यांची कात या एकांकिकाही लक्षवेधी ठरल्या होत्या़ शनिवारी दिवसभरात ११ एकांकिका सादर होणार आहेत़ यात जळगावसह इतर शहरांचे संघ सहभागी होतील़

Web Title: Light on social issues from singularities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.