प्रकाशातील घटना : खोदकाम करताना सापडल्या मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:25 PM2018-01-25T12:25:55+5:302018-01-25T12:26:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : भोई गल्लीतील घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना काळ्या पाषाणातील विष्णू व लक्ष्मी अवतारातील दोन मुर्ती सापडल्या. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, 40 ते 45 वर्षापूर्वीदेखील गावात अशा प्रकारच्या मुर्ती सापडल्या होत्या.
प्रकाशा, ता.शहादा येथील गौतमेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गावर सदा भोई यांचे घर आहे. भोई हे घराच्या मागील बाजूस जेसीबीच्या मदतीने खोदकाम करीत असताना त्यात दोन काळ्या पाषाणाचा आकर्षक मूत्र्या आढळून आल्या. मात्र या मूर्ती खंडित असून, त्यांची चार ते पाच फुटार्पयत उंची आहे. या वेळी भावेश बागडे व तुषार भोई यांनी या मूर्ती उचलून बाहेर ठेवल्या व पाण्याने स्वच्छ केली असता एक मूर्ती विष्णूची तर एक देवीची आहे. या मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या वेळी नागरिकांनी मूर्त्ीची पूजा करून दर्शन घेतले.
याआधीही 1972 - 73 मध्ये न्हावी गल्लीतील पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम करताना विष्णूची व कानुमातेची मूर्ती निघाली होती. त्या वेळी धुळे येथील राजवाडे संशोधन केंद्रातील अभ्यासकांनी येवून पाहणी करून काही मूर्ती धुळे येथे ठेवल्या आहेत. मात्र विष्णूची मूर्ती ज्या ठिकाणी निघाली त्या ठिकाणी मंदिर बांधून स्थापना करून देण्यात आली आहे.
मूर्ती निघाल्याचे वृत्त वा:यासारखे सर्वत्र पसरले. मात्र प्रशासनातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने अद्यापही मूर्ती त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने दखल घेवून या मूर्तीबाबत अधिक संशोधन करून ग्रामस्थ व भाविकांना माहिती करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.