जिल्ह्यात पावणेआठ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:36 PM2020-09-29T12:36:51+5:302020-09-29T12:36:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आॅगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आॅगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सात कोटी ७५ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील २६ हजार ४६१ शेतकऱ्यांकडील ११ हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
नंदुरबार तालुक्यातील २८२ हेक्टर, नवापूर ३,९१८ हेक्टर, अक्कलकुवा २,५९९ हेक्टर, शहादा १,१९० हेक्टर, तळोदा १२५ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात ३,१२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यातील
नुकसानीचे पंचनामे
सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाºयामुळे ८,२३४ शेतकऱ्यांच्या शेतात ४,३६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.
प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात १,१७० शेतकºयांचे ९८५ हेक्टर, नवापूर ५,१२३ शेतकºयांचे १,८२८ हेक्टर, अक्कलकुवा २१० शेतकºयांचे ६० हेक्टर, शहादा ३५१ शेतकºयांचे २६१ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात १,३८० शेतकºयांच्या १,२३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कापूस, ऊस, मका,सोयाबीन , मिरची, तूर, भात आणि ज्वारी पिकांचा समावेश आहे. दोन्ही महिन्यातील नुकसानीची मदत शेतकºयांना तातडीने मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(विशेष पान/३)