‘पद्मावत’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुडवला एक लाख 62 हजारांचा कर : हिंदू जनजागृती समितीचा नंदुरबार येथे आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:17 PM2018-01-23T17:17:24+5:302018-01-23T17:17:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटाचे निर्माते हे शासनाचा कर बुडवणारे असून याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जागृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली़
नंदुरबार शहरातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस हिंदू जनजागृती समितीचे डॉ़ नरेंद्र पाटील, क्षत्रिय राणा राजपूत समाज सेवा समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव, समितीच्या धुळे-जळगाव जिल्हा समन्वयक रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या़
प्रसंगी माहिती देताना नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, संजय लिला भन्साळी प्रोडक्शन्सच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरात मसाई पठारावर पद्मावत या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च 2017 मध्ये करण्यात आले होत़े याप्रकरणी संबधितांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व वनविभाग यांच्याकडून घेतलेली परवानगी अटही पाळलेली नाही तसेच 20 दिवसांचे चित्रीकरणाचे एक लाख 91 हजार रूपये वैध शुल्क न भरता केवळ तीन दिवसांचे 28 हजार रूपये शुल्क भरले आह़े यातून शासनाची एक लाख 62 हजार 742 रूपयांची फसवणूक करणा:या संजय लिला भन्साळी यांच्या निर्मिती संस्थेवर फौजदारी गुन्हा करण्यात यावा़
यावेळी राणा राजपूत सेवा समितीचे चेतन राजपूत यांनी सांगितले की, 25 रोजी होणा:या भारत बंदमध्ये सहभाग राहणार आह़े नंदुरबार शहरात पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत राजपूत समाजातील ज्येष्ठ आणि युवकांची बैठक मंगळवारी होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आह़े
नरेंद्र पाटील यांनीही शासनाची फसवणूक करणा:यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कोल्हापूर पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यांविरोधात हिंदू जनजागृती समितीच्यावतीने गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती दिली़