लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे शिवारातील पाणीपुरवठय़ासाठी कार्यान्वित असलेल्या ट्रान्सफार्मरचे अज्ञात चोरटय़ांनी नुकसान करून त्यातील 15 हजार रुपयांचे ऑईल व कॉईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, मंदाणे गावात पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीची भोंगरा रस्त्यालगत स्वतंत्र विहीर व कुपनलिका आहे. यासाठी गुलाबराव ङिापा पवार यांच्या शेताजवळ स्वतंत्र ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरूवार, 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी खांबावरून ट्रान्सफार्मरवरच्या तारा तोडून खाली उतरविला व ट्रान्सफार्मर उघडून ऑईल जमिनीवर फेकून दिले व ट्रान्सफार्मरमधील तांब्याची कॉईल असलेला गड्डा तोडून तो चोरून नेला. यात ट्रान्सफार्मरमधील विद्युत साहित्याचे नुकसान केले. यामुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालासह एकूण 15 हजारांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी मंदाणे येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता विकास पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरटय़ांविरूद्ध चोरी व नुकसानीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धनराज जाधव करीत आहेत.
ट्रान्सफार्मरचे नुकसान करून साहित्याची चोरी
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: August 19, 2017 12:33 PM
मंदाणे परिसरात खळबळ : अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देमोठय़ा टोळीची शक्यता ट्रान्सफार्मरसारखी अवजड वस्तू असताना हा प्रकार करण्याचे धाडस कोणी एकटा चोरटा करणार नाही. या प्रकारावरून आठ ते दहा जणांची सराईत टोळी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध लावून अशाप्रकारे शेतातील अवजारे, व