‘मेडीकल कॉलेज’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:52 AM2019-01-11T11:52:33+5:302019-01-11T11:53:23+5:30

-मनोज शेलार बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वप्नपुर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे हस्तांतरीत ...

'Medical College' to dream of dream! | ‘मेडीकल कॉलेज’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल!

‘मेडीकल कॉलेज’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल!

Next

-मनोज शेलार
बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वप्नपुर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे हस्तांतरीत करण्याचा अध्यादेश निघाल्याने यादृष्टीने एक पाऊल पडले आहे. लवकरच तांत्रिक बाबींची पुर्तता करून पुढील वर्षापासून प्रत्यक्षात विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी प्रय} होणे गरजेचे आहे. 
नंदुरबारात 2013 मध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आणले होते. नंदुरबारसह बारामती, अलीबाग, चंद्रपूर, गोंदिया येथे देखील वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले होते. परंतु बारामती वगळता नंदुरबारसह अलीबाग, चंद्रपूर, गोंदिया येथे शासनाने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पुर्तता पुर्ण केलेली नव्हती. त्यामुळे परिषदेच्या पथकाचे नंदुरबारात  पुरेसे रुग्णालय, त्यातील खाटांची संख्या, इमारतीसाठीची जागा आणि एकुणच सोयी-सुविधा याबाबत समाधान झाले नव्हते. त्यामुळे 2015 साली हे महाविद्यालय रद्द करण्यात आले. त्यानंतर आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पुन्हा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आणि एकुणच भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे देखील पाठपुरावा केला. त्याचा परिणाम 2017 मध्ये नंदुरबारात झालेल्या महाआरोग्य मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नंदुरबारसह जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयांची नव्याने घोषणा केली. यावेळीही नंदुरबार पिछाडीवर राहिले. जळगावला आवश्यक त्या सर्व सुविधा तयार करून गेल्यावर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू देखील करण्यात आले. नंदुरबारचा प्रस्ताव मात्र तसाच पडून राहिला. परिणामी यावेळी देखील हे महाविद्यालय रद्द होईल किंवा कसे याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.  शासनाने जिल्हा रुग्णालयात डीनचे कार्यालय सुरू केले. बहुतांश वेळा हे कार्यालय बंद अवस्थेतच राहत होते. त्यामुळे यावेळीही जिल्हावासीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाते की काय अशी शंका असतांनाच 9 जानेवारी रोजी शासनाने अध्यादेश काढून नंदुरबारचे   जिल्हा सामान्य रुग्णलय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रक्रिया देखील लागलीच सुरू करण्याचे सुचीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यासाठी स्वत: लक्ष देवून आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान 500 खाटांच्या रुग्णालयाची सोय असणे आवश्यक असते. नंदुरबारातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटांची संख्या 250 इतकी आहे. महिला रुग्णालयाच्या खाटांची संख्या 100 इतकी आहे तर प्रस्तावीत आयुष रुग्णालयाच्या खाटांची संख्या 50 इतकी आहे. सर्व मिळून 400 खाटांची संख्या होते. तरीही 100 खाटांची कमतरता राहतेच. त्यामुळे आणखी 100 खाटांच्या रुग्णालयासाठी प्रय} करावा लागणार आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयासाठीची इमारत, होस्टेलची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्याच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जागेची उपलब्धता लक्षात घेता त्या ठिकाणी महाविद्यालयाची इमारत आणि होस्टेलची इमारत उभी राहू शकते. त्याची पहाणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे पथक लवकरच नंदुरबारात दाखल होणार आहे. नंदुरबारच्या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 100 इतकी आहे. पुढील काळात ती वाढण्याची शक्यता देखील आहे. त्यादृष्ीने आतापासूनच आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक ठणार आहे. 
नंदुरबारात विविध उच्च शिक्षणाची सोय होत आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय येथे सुरू झाले आहे. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये विविध विषयांचे अभ्यासक्रमांची सोय आहे.  राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा देखील नंदुरबारातच सुरू झाली आहे. त्यातच आता वैद्यकीय महाविद्यालयाची भर पडणार असल्याने पुणे, नाशिक, मुंबईसारख्या शहरात मिळणारे सर्व शिक्षण नंदुरबारातही उपलब्ध होत असल्याने शैक्षणिकदृष्टया नंदुरबारही आता आगेकूच करू लागले आहे. 

Web Title: 'Medical College' to dream of dream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.