लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : भारतीय अर्थव्यवस्था ही करदात्यांवर अवलंबून आह़े देशातील उद्योग व्यवसायांची उलाढाल बँक व्यवहाराशी जोडल्यास अर्थव्यवस्थेत अधिक पारदर्शकता निर्माण होईल असे प्रतिपादन जेष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी केल़े शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शहादा तालुका व्यापारी महासंघातर्फे जीएसटीवर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होत़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील जिल्हा व्यापारी असोसिएशन महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग उपस्थित होत़े या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, डॉ़ कांतीलाल टाटीया, शहादा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल शर्मा, महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद्र चोरडीया आदी उपस्थित होत़े पुढे बोलताना बाकील म्हणाले की, जीएसटी कराबाबत विचार तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनच सुरु झाला होता़ जीएसटी करप्रणाली स्विकार करणारा इंडोनेशीया हा पहिला देश असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितल़े करबुडव्या व्यापा:यांबाबत ते म्हणाले की, ग्राहकाचे हित हे व्यापा:यांचे प्रथम दायित्व असत़े परंतु काही व्यापा:यांकडून ग्राहकांना गृहीत धरण्यात येत असत़े पैसा कमविण्याच्या उद्देशाने करचोरीचे प्रकार घडून काळया पैशांची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितल़े व्यवस्था ही मानसाला संस्कृत व विकृतदेखील बनवत असत़े त्यामुळे व्यवस्था बदलली की माणसातही बदल घडत असतात़ अर्थशास्त्र हे पैशाचे नव्हे तर संशोधनाचे शास्त्र असल्याचेही त्यांनी सांगितल़े सर्वत्र आर्थिक व्यवहार हे बँकांशी जोडल्यास पारदर्शकता येण्यास मदत होणार आह़े परिणामी याने भारताची अर्थव्यवस्था अधिक सशक्त होण्यास मदत होणार असल्याचा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला़ तसेच अर्थव्यवस्थेसोबतच पर्यावरण संरक्षणावरसुध्दा व्यापक दृष्टीने विचारमंथन होणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवजरून सांगितल़ेकार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल शर्मा यांनी केल़े सूत्रसंचालन व आभार प्रा़ डॉ़ विजयप्रकाश शर्मा यांनी केल़े मनोज भाटीया, विनय गांधी, विजय भावसार, विजय धनकानी, संजय छाजेड, राजेंद्र भावसार, विलास सोनार, अतीश सोनार, वसंत पटेल, नूर मोहम्मद यांच्यासह व्यापारी उपस्थित होत़े
...तर अर्थव्यवस्थेत अधिक पारदर्शकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:05 AM