आॅनलाईन लोकमतनंदुरबार , दि.२१ : तालुक्यातील शनिमांडळ येथे हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला़ यावेळी त्यांनी माता-पिता आणि कुटूंब संस्थेचे महत्त्व सांगत विविध विषयांवर प्रबोधन केले़लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम झाला़ प्रसंगी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल अॅड़राजेंद्र रघुवंशी, अनिता रघुवंशी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, महेंद्र रघुवंशी, विलास रघुवंशी, गौरी रघुवंशी, नगरसेवक दीपक दिघे, डॉ़ सयाजी मोरे, संतोष पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष बीक़े़पाटील, राकेश मोरे, सरपंच सिमा मोरे, कृष्णा राजपूत, संजय अग्रवाल, उपसरपंच अशोक पाटील, अनिल पाटील, रोहिदास राठोड आदी उपस्थित होते़प्रारंभी बटेसिंह रघुवंशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ यानंतर बोलताना ह़भ़प इंदूरीकर महाराज यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या मातीतून वृद्धाश्रम नावाची संस्था हद्दपार होणे गरजेचे आहे़ मातृ-पितृ हीच खरी ईश्वर सेवा आहे़ त्यांचे संस्कार सदैैव प्रेरणादायी ठरत आहेत़ सध्याच्या युगात पती-पत्नी दोन्ही नोकरीला असून गलेलठ्ठ वेतन कमावणाºयांची मुले काय दिवे लावतात, हे दिसून येते़ माणसामध्ये दान देण्याची वृत्ती असावी, दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा संगम असला पाहिजे़मराठी आणि इंग्रजी भाषेतून प्रबोधन करताना इंदूरीकर महाराज यांनी शेवटी सांगितले की, शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, सामूहिक लग्न समारंभासाठी शासन पोटतिडकीने ओरडत आहे़ तरीही कर्ज काढून विवाह सोहळे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून वृद्धाश्रम हद्दपार झाले पाहिजेत : इंदूरीकर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 6:54 PM
शनिमांडळ येथे हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला़
ठळक मुद्देमातृ-पितृ हीच खरी ईश्वर सेवा आहे़मानवी जीवनात दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा संगम असावाशनिमांडळ येथे इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन