महसूली दर्जाच्या 73 गावांमध्ये हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:51 AM2019-01-11T11:51:40+5:302019-01-11T11:51:46+5:30

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील वनगावांचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये मार्गी लावला होता़ एकूण 73 वनगावांना महसूली  दर्जा ...

Movement movements in revenue-driven 73 villages | महसूली दर्जाच्या 73 गावांमध्ये हालचालींना वेग

महसूली दर्जाच्या 73 गावांमध्ये हालचालींना वेग

Next

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील वनगावांचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये मार्गी लावला होता़ एकूण 73 वनगावांना महसूली  दर्जा प्राप्त झाल्यानंतर आता या गावांना ग्रामपंचायत निर्मितीच्या हालचाली सुरु झाल्या असून येत्या 26 जानेवारी रोजी तसे ठराव करण्यात येणार असल्याची माहिती आह़े हे ठराव पंचायत समित्यांमार्फत जिल्हा परिषदेत आल्यानंतर जून 2019 र्पयत या ग्रामपंचायती अस्तित्वात येणार असल्याचे खात्रीशीरपणे सांगितले जात आह़े    
धडगाव तालुक्यातील 73  गावे वनविभागाच्या हद्दीत असल्याने त्यांना वनगावांचा दर्जा देण्यात आला होता़ 1971 मध्ये वनजमिन अधिनियम संरक्षण कायदा लागू झाल्यापासून ही गावे वनगावे म्हणून घोषित होती़ वनगावे असल्याने याठिकाणी महसूली योजना आणि इतर लाभ देण्यात येत नव्हत़े यातून तेथील ग्रामस्थ हे शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपासून ंवंचित होत़े 47 वर्षापासून येथील ग्रामस्थ सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना महसूली दर्जा देण्याची मागणी करत होत़े या मागणीवर प्रशासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये कारवाई करुन सर्व 73 गावे ही महसूली करण्याचे आदेश काढले होत़े ही गावे महसूली झाल्यानंतर प्रशासनाने पुढील प्रक्रियांबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या-त्या ग्रुप ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत़ या सूचनानंतर तेथील ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत निर्मितीला होकार दर्शवत ग्रामसभा घेऊन विभाजनाचे प्रस्ताव देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आह़े 26 जानेवारी रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये याबाबतचे ठराव मजूंर झाल्यास धडगाव तालुक्यातील 10 ग्रुप ग्रामपंचायतींचे विभाजन होणार आह़े 
धडगाव तालुक्यात एकूण 99 महसूली गावे नोव्हेंबर 2018 पूर्वी होती़ यात  73 समावेश होऊन ही संख्या आता 163 झाली आह़े नवीन ग्रामपंचायतींमुळे धडगाव तालुक्याच्या विकासाला वेग येऊन पेसांतर्गत निधी तसेच विकासकामांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े राजबर्डी ग्रामपंचायत अंतर्गत शेलकुवी, कामोद बुद्रुक, खर्डी बुद्रुक, शिंदवाणी, कात्रा, तेलखेडी, कुवरखेत, कुकलट, वलवाल ही गावे आहेत़
चिंचकाठी ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत पिंपळबारी, चांदसैली, चिंचकाठी व माऴ 
चिखली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चिखली, बोरी, बिलगाव, त्रिशुल, साव:या दिगऱ 
गेंदा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत गेंदा, जुनाना, शेफदा, खुटवडा़
कात्री ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत वाहवाणी, पौला़ 
मांडवी बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीत मक्तरङिारा, टेंभुर्णी, झुम्मट, खडकाले बुद्रुक, खडकाले खुर्द, निगदी, वावी, बोदला, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द या गावांचा समावेश आह़े 
बिजरी ग्रामपंचायत अंतर्गत बिजरी, शिरसाणी, गौ:या, सूर्यपूर (छिनालकूवा), कामोद खुर्द, जर्ली, मनखेडी़ 
तोरणमाळ ग्रुपग्रामपंचायतंतर्गत केलीमोजरा, केलापाणी, फलई, खडकी, सिंदीदिगर, झापी, तोरणमाळ, भादल, 
रोषमाळ खुर्द ग्रामपंचायतीत आकवाणी कुकतार, कुंभरी, गोराडी, थुवाणी, पिंपळचौक,अट्टी, केली, रोषमाळ खुर्द, भरड, शिक्का, डोमखेडी, शेलगदा, निमगव्हाण़ 
भूषा ग्रुपग्रामपंचायतीत भूषा, उडद्या, वरवाली, खर्डी खुर्द, सादरी, लेकडा, साव:या, भमाणे, भाबरी या गावांचा समावेश आह़े 
 

Web Title: Movement movements in revenue-driven 73 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.