नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:00 PM2018-12-30T13:00:18+5:302018-12-30T13:00:23+5:30

नंदुरबार : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी परवेज खान करामत खान यांची निवड करण्यात आली़  शनिवारी दुपारी 12 वाजता पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी ...

In the municipal council, the Vice-President and the elected corporators are elected | नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड

नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड

Next

नंदुरबार : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी परवेज खान करामत खान यांची निवड करण्यात आली़  शनिवारी दुपारी 12 वाजता पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात उपनगराध्यक्षासह चार स्विकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली़ या निवड प्रक्रियेवर भाजपाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला होता़  
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़ निवडणूक प्रक्रियेचे कामकाज मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी पाहिल़े शिवसेनेच्या शोभा मोरे यांचा उपनगराध्यक्षपदाचा वर्षभराचा तसेच पालिकेच्या चार स्विकृत नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शनिवारी पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती़ या सभेपूर्वी सकाळी 10 वाजेपासून उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन मागवण्यात आले होत़े यात सत्ताधारी ्रकाँग्रेसतर्फे परवेज खान करामत खान यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आल़े या अर्जाला कैलास पाटील हे सूचक तर किरण रघुवंशी हे अनुमोदक होत़े दरम्यान भाजपातर्फे नगरसेवक निलेश सुदाम पाडवी यांनी परवेज खान यांच्याविरोधात अर्ज दाखल केला़ त्यास सूचक भाजपाचे गटनेता अॅड़ चारुदत्त कळवणकर तर अनुमोदक गौरव चौधरी होत़े दोघांच्या अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर 12 वाजेपासून विशेष सभा बोलावण्यात आली़ या सभेत दोघांनी माघार न घेतल्याने नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी हात उंचावून मतदान करण्याचे नगरसेवकांना सूचित केल़े त्यांच्या या सूचनेवर भाजपाचे गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी आक्षेप घेत गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्याची मागणी केली़ परंतू शासनाने गुप्त मतदान पद्धती बंद केल्याचे सांगून नगराध्यक्षा रघुवंशी यांनी ही मागणी फेटाळून लावली़ 
यानंतर काँग्रेसतर्फे उपस्थित असलेल्या 25 नगरसेवकांनी हात उंचावून परवेज खान यांना पाठिंबा देत उपनगराध्यक्षपद बहाल केल़े उपनगराध्यक्ष निवडीनंतर  काँग्रेसतर्फे स्विकृत नगरसेवकपदी राकेश अशोक खलाणे, शिवाजी राजाराम येडगे, मोहसीन खान जाकीर खान पठाण यांची नावे जाहिर करण्यात येऊन स्विकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली़  भाजपातर्फे स्विकृत नगरसेवक म्हणून नामनिश्चिती करण्यात आलेल्या सदानंद पृथ्वीराज ङोरवार यांची निवड करण्यात आली़ या निवडीनंतर काँग्रेसतर्फे नवनियुक्त उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य यांची उघडय़ा जीपमधून मिरवणूक काढत आनंद व्यक्त करण्यात आला़ यात काँग्रेसच्या नगरसेवकांसह कार्यकर्ते सहभागी झाले होत़े 
 

Web Title: In the municipal council, the Vice-President and the elected corporators are elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.