पालिका कर्मचा:यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:48 PM2018-12-16T12:48:55+5:302018-12-16T12:49:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका कर्मचा:यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ कर्मचा:यांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. दरम्यान, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिका कर्मचा:यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ कर्मचा:यांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. दरम्यान, 1 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
पालिका कर्मचा:यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटना एकवटल्या आहेत. शासन लक्ष देत नसल्यामुळे 1 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने शनिवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान भजन म्हणत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रय} करण्यात आला.
कर्मचा:यांच्या मागण्यांमध्ये जानेवारी 2016 पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा. 2000 पूर्वीच्या सर्व रोजंदारी कर्मचा:यांना कायम करावे. नगर पंचायतीमधील कर्मचा:यांची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी. सफाई कामगारांना मुकादम पदावर तसेच त्यांच्या वारसांना वरिष्ठ पदावर पदोन्नती द्यावी, लाड कमिशनच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना नेमणुका द्याव्या, मोफत घरे बांधून द्यावी.स्वच्छता निरिक्षकांचा राज्यस्तरीय संवर्ग डिसेंबरपूर्वी करण्यात यावा. सफाई विभागाची ठेका पद्धती बंद करावी, सफाई आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील वर्ग चार च्या कर्मचा:यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग तीनच्या जागेवर पदोन्नती द्यावी. 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अभियांत्रिकी सेवेतील कर्मचा:यांना न्यायालयीन निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे पदनाम देवून सुधारीत वेतन श्रेणी लागू करावी. अगिAशमन संवर्गातील कर्मचा:यांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे पदोन्नती द्यावी. सहा संवर्गातील 25 टक्के जागेवर नगर परिषद कर्मचा:यांमधून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार परीक्षेची अट शिथील करून सरळ समावेशन करावे. संवर्ग कर्मचा:यांना मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देणे व पदोन्नतीमध्ये 50 टक्के जागा संवर्ग कर्मचा:यांमधून भराव्या यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबधीतांना देण्यात आले आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र एम.पाखले व सचिव शशिकांत वाघ यांच्यासह पदाधिकारी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, शहादा व तळोदा येथे देखील आंदोलन करण्यात आले.