नंदुरबारातील मिरची उद्योग सापडला संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 01:24 PM2017-12-07T13:24:42+5:302017-12-07T13:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या वर्षापासून मंदीची मार सहन करत तग धरून असलेल्या मिरची उद्योगावरची संकटे दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या चिंता वाढल्या आहेत़ दरवर्षी किमान एक लाख क्विंटल होणारी आवक यंदा 15 टक्केही झालेली नसल्याने मिरची उद्योगावरचे संकट अधिक गडद झाले आहेत़
जिल्ह्यात दरवर्षी किमान एक हजार 800 हेक्टरवर मिरची लागवड होत़े नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यात उत्पादित केली जाणारी दिवाळीनंतर बाजारात येत़े यंदा नंदुरबार तालुक्यात 1 हजार 150 आणि शहादा तालुक्यात 600 हेक्टर मिरची लागवड झाली होती़ लागवडीत घट झाल्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली असून परिणामी नंदुरबार बाजार समितीत डिसेंबर महिना उजाडूनही केवळ 10 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आह़े आगामी महिनाभर हा हंगाम सुरू राहणार असला तरीही त्यात केवळ 10 हजाराची वाढ व्यापा:यांना अपेक्षित आह़े
यंदा पावसाअभावी आधीच शेतक:यांना संकटांचा सामना करावा लागला होता़ वेळेवर पाऊस न पडल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोरडी झाली होती़ यामुळे काही शेतक:यांनी उशिराने मिरची लागवड करून पावसासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता़ यातच दोन महिन्यांपूर्वी हिरव्या मिरचीचा बाजार तेजीत असल्याने शेतक:यांनी याच मिरचीचा तोडा करून विक्री केली होती़ यातून त्यांनी नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न केला होता़ भाजीपाला बाजारात 18 ते 25 रूपये किलो दराने विक्री झालेल्या या मिरचीमुळे लाल मिरचीचे उत्पादन अधिकाधिक कमी होऊन पथारीवर मिरची आवक कमी दिसत आह़े नंदुरबार शहरातील अनेक व्यापा:यांनी नोव्हेंबरच्या अंतिम आठवडय़ार्पयत मिरची खरेदी केली होती़ गेल्या चार दिवसात मिरची आवकच नसल्याने खरेदीही बंद पडली आह़े