विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी बुधवारी नंदुरबार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:48 PM2018-01-24T12:48:21+5:302018-01-24T12:48:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी नंदुरबार बंदची हाक दिली होती़ सकाळपासून शहरातील मुख्य बाजारापेठेत व्यापा:यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती़
विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी अक्कलकुवा, तळोदा व धडगाव तालुक्यात या आधी बंद पुकारण्यात आला होता़ त्याच पाश्र्वभूमिवर बुधवारी विविध आदिवासी संघटनांकडून नंदुरबारात बंद पुकरण्यात आला होता़ त्यामुळे सकाळपासूनच व्यापा:यांनी आपली दुकाने उघडलीच नव्हती़ आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरतांना दिसून आल़े तसेच विद्यार्थिनीच्या आत्महत्येतील दोषींवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणीही करीत होत़े कार्यकत्र्याकडून पायी तसेच मोटारसायकलीवर फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होत़े बंदला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने फौजफाटा तैनाद करण्यात आला होता़