विस्थापीतांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:57 PM2018-12-19T12:57:09+5:302018-12-19T12:57:13+5:30

सरदार सरोवर : मेधा पाटकर यांची उपस्थिती, जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक

Nandurbar Collectorate of the displaced people | विस्थापीतांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

विस्थापीतांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

Next

नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापीतांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी विस्थापीतांना आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिका:यांशी दिर्घ चर्चा करण्यात आली.
सरदार सरोवर विस्थापीतांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. ते सोडविण्यासाठी नर्मदा आंदोलनातर्फे प्रशासनाशी वेळोवेळी चर्चाही करण्यात आली. परंतु अनेक समस्या अद्यापही जैसे थे आहेत. आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह शेकडो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. प्रवेशद्वारावर घोषणा देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व इतर अधिका:यांसमवेत चर्चा करण्यात आली. त्यात सर्वच बाधीतांचे पुनर्वसन झाल्याशिवाय, प्रश्न सुटल्याशिवाय पुनर्वसन कार्य आणि संबधीत कार्यालये सुरू राहू द्यावे. बंद करण्याची घाई करू नये. शेकडो आदिवासींचे पुनर्वसन पुर्ण अथवा बाकी आहे. यामध्ये महाराष्ट्रातच व गुजरातमध्ये  पुनर्वसन झालेली वा होणारी कुटूंबे सामील आहेत. आदिवासी क्षेत्रात पेसा कायदा हा स्वशासनाचा मानला जातो. त्याचे पुर्ण पालन करावे. गावाचा संशधनावरील अधिकार, भूसंपादनापूर्वी व पुनर्वसनापूर्वी गावाच्या सल्ला सहमतीची पूर्वअट, गावाचा स्वत:चा विकास आराखडा हेच प्राधान्याने नियोजन या सा:या बाबींसह होणे गरजेचे असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी पटवून दिला. 
सायंकाळी उशीरार्पयत    याबाबत बैठक सुरू होती. महसूलचे विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनाचे लतिका राजपूत, चेतन साळवे व शेकडो आंदोलक देखील बैठकीला उपस्थित होते.
 

Web Title: Nandurbar Collectorate of the displaced people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.