नंदुरबार जिल्ह्यात अडीच लाख टन चा:याची कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:39 PM2019-05-25T12:39:31+5:302019-05-25T12:39:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता ...

Nandurbar district is 2.5 lakh tonnes: lack of it | नंदुरबार जिल्ह्यात अडीच लाख टन चा:याची कमी

नंदुरबार जिल्ह्यात अडीच लाख टन चा:याची कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता आणखी वाढणार आहे. जिल्ह्याला लागणा:या एकुण चा:यापैकी सद्य स्थितीत दोन लाख 65 हजार मे.टन चा:याची कमतरता आहे. दरम्यान, अनेक गावांमधून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे येवू लागली असली तरी प्रशासन अद्याप त्याबाबत गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.      
गेल्या वर्षी अपेक्षीत पजर्न्यमान झाले नाही. सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाला. तो देखील अनियमित होता. त्यामुळे खरीप पीक जेमतेमच आले.  पाऊसच कमी असल्यामुळे धरणे, नदी, नाले, बंधारे कोरडे राहिले. परिणामी रब्बी पीक देखील घेता आले नाही. त्याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला. ही  बाब लक्षात घेता गेल्या महिन्यापासून जनावरांच्या चा:याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागातील शेतक:यांनी चारा, पाण्याअभावी आपली गुरं विकून टाकली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली चारा छावणीची मागणी प्रशासनाने पुर्ण केली असती तर आज अनेक शेतक:यांची गुरं विक्री झाली नसती.
परजिल्ह्यात बंदी
चारा टंचाईची स्थिती उद्भवणार ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यातच परराज्य आणि इतर जिल्ह्यात चारा विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. तसा अद्यादेशही काढलेला आहे. असे असतांना बराच चारा परजिल्ह्यात विक्री झाला आहे. त्यासाठी संबधीतांनी विविध माध्यमाचाही वापर केला आहे. 
चारा उत्पादन अभियान
कृषी विभागाच्या चारा उत्पादन अभियानाचाही फारसा उपयोग झालेला नाही. शेतक:यांना सिंचनासाठी पाणीच नसल्यामुळे चारा लागवड करणार तरी कशी हा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता यंदा कृषी विभागाच्या या योजनेलाही अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याची स्थिती आहे. 
परिस्थिती बिकट
पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा संदर्भातील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील काही भाग तसेच नवापूर तालुक्यातील पूर्व भागात ही स्थिती गंभीर आहे. अनेकांनी आपली गुरे पोषणासाठी इतर ठिकाणी पाठवून दिली आहेत. 
तापी काठावर छावण्या..
तापी काठावर अर्थात प्रकाशा ते सारंगखेडा या दरम्यान तापीला पाणी आहे. या दोन्ही ठिकाणी बॅरेज असल्यामुळे पाणी अडविले गेले आहे. त्यामुळे तापी काठावर चारा छावण्या उभारल्यास जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार होता तसेच चारा वाहतुकीलाही सोयीचे ठरणार होते. त्यानुसार सव्र्हे देखील करण्यात आला. परंतु छावणी उभारण्यासारखी परिस्थिती नसल्याचे चित्र प्रशासनानेच निर्माण केल्याने हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने चारा छावण्यांना खो बसणार आहे. 

Web Title: Nandurbar district is 2.5 lakh tonnes: lack of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.