नंदुरबार, नवापूरात 14 तास वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:53 AM2017-09-11T10:53:21+5:302017-09-11T10:53:21+5:30

मुसळधार पावसाचा परिणाम : दुरूस्तीसाठी धुळे व चाळीसगाव येथून मागवावे लागले पथक

 Nandurbar, New Hour, 14 Hours Power Gul | नंदुरबार, नवापूरात 14 तास वीज गुल

नंदुरबार, नवापूरात 14 तास वीज गुल

ठळक मुद्दे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस अनेक दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व विसरवाडी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तर नवापूर मंडळात 60 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. नंदुरबा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उर्जा मंत्र्यांच्या आगमनाच्या आधीच वीज कंपनीने आपला कारभार चव्हाटय़ावर आणला आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात तब्बल 14 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरासह निम्मे तालुका आणि संपुर्ण नवापूर तालुका अंधारात होता. त्यामुळे नंदुरबार आणि नवापूर शहरातील पाणी पुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला होता.
वीज वितरण कंपनीने पावसाळ्याआधी सर्वच संकटांना तोंड देण्यास कंपनी सज्ज असल्याचे सांगितले होते. तसे नियोजन देखील करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु वीज कंपनीच्या सुदैवाने यंदा ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात वादळी पाऊस झालाच नव्हता. शनिवारी रात्री मात्र वादळी पाऊस झाल्याने वीज कंपनीचे वाभाडे निघाले. शनिवारी सांयकाळी सात वाजेपासून ढगांच्या गडगडाटात अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस सुरू होता. याच दरम्यान वावद ते उमर्दे दरम्यान टॉवर लाईनवर वीज पडल्याने आणि मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अशा वेळी पर्यायी यंत्रणा असणे आवश्यक असतांना वीज कंपनीकडे तसे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात अंधार होता. 
रात्री आठ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रविवारी सकाळी 10 वाजता सुरळीत झाला. बिघाड दुरूस्त करणे आणि तुटलेल्या तारा तातडीने जोडण्यासाठी धुळे येथील पथकाला बोलविण्यात आले होते. या पथकाने पहाटे कामाला सुरुवात करून सकाळी 10 वाजेर्पयत काम पुर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला. ज्या ठिकाणी बिघाड झाला होता त्याच ठिकाणच्या शेतात पाणी होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठय़ा अडचणी येत होत्या. त्यामुळे पहाटे कामाला सुरुवात करण्यात आली.
नवापूर तालुकाही अंधारात
नंदुरबार शहरासह तालुक्यातील काही भाग अंधारात होता. त्याचप्रमाणे नवापूर शहर व संपुर्ण तालुका देखील अंधारात होता. रात्री आठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेअकरा वाजेर्पयत नवापूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.  
पाणी पुरवठय़ावर परिणाम
तब्बल 14 ते 15 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नंदुरबारसह नवापूर शहरातील आणि अनेक गावांमधील पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला होता. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या झराळी फिडरवर देखील वीज पुरवठा नसल्यामुळे तेथून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शहरातील जलकुंभ भरण्यावर झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागली.
काही भागात सुरळीत
नंदुरबारातील काही भागात नेहरूनगर उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना ब:यापैकी दिलासा मिळाला होता. असे असले तरी अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच होते.
 

Web Title:  Nandurbar, New Hour, 14 Hours Power Gul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.