नंदुरबारात बेघरांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:14 PM2019-03-01T12:14:29+5:302019-03-01T12:16:58+5:30

नंदुरबार : शहरी बेघरांसाठी पालिकेने तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय केली असून त्यांची देखभाल व सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय ...

 In Nandurbar, provision of temporary shelter to the homeless | नंदुरबारात बेघरांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणार

नंदुरबारात बेघरांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणार

googlenewsNext

नंदुरबार : शहरी बेघरांसाठी पालिकेने तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय केली असून त्यांची देखभाल व सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ अजेंड्यावरील ११ विषयांसह आयत्या वेळच्या तीन विषयांना मंजूरी देण्यात आली़ अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान हे होते़
गुरुवारी सकाळी पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी बहुउद्देशीय सभागृहात ही सभा घेण्यात आली़ पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी गणेश गिरी होते़ प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले़ यानंतर रुखमाबाई नगरातील सर्वे क्रमांक ३५१/२ येथे एचडीपीई पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी ५ लाख ८२ हजार ३२३ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, २०१९-२० या वर्षासाठी पालिकेच्या स्मशान भूमीसाठी लागणारे जळाऊ लाकूड खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये खर्च, जी़टी़पाटील महाविद्यालय परिसरातील भिलाटीजवळ व्यायाम शाळा बांधकाम तसेच रस्ते व गटार कामाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, २०१९-२० या वर्षाकरिता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडील इलेक्ट्रीक मोटारी, सबमर्सिबल पंप रिवार्इंडींग करणे, दुरुस्ती करणे दर मागवणे व यासाठी येणाºया खर्चास मंजूरी देणे, पालिकेतर्फे चालवल्या जाणाºया दिनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षाकरिता तात्पुरत्या निवाºयामध्ये राहणाºया शहरी बेघरांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी नवीन संस्थेला काम देण्यासाठी अभिकर्त्याची नियुक्ती करणे, शहरातील सर्वे क्रमांक ५६७ या पालिकेच्या मालकीच्या दवाखाना व सुतिकागृहाजवळील खुल्या जागेला कुंपण करुन भिंतीचे बांधकाम करणाºया ठेकेदारास मुदतवाढ देणे, सर्वे क्रमांक १३३/१ व १४३/१/२/३ येथील घनकचरा व्यवस्थापनेच्या प्रकल्प (भाग १ व २) जागेचे कंपाउंड बांधकाम करणाºया ठेकेदारास मुदतवाढ देणे, रॉयल पार्क मधील अंतर्गत रस्ते खडीकरण करणाºया ठेकेदारास मुदतवाढ देणे, इमाम बादशाह दर्ग्याच्या पहिल्या कमानीपासून पश्चिमेस कब्रस्तानमधून इदगाह कमान बिलाडी रस्त्यापर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामासाठी ६५ लाख ६२ हजार ७८६ रुपयांच्या खर्चास मंजूरी देणे, रज्जाक पार्कमध्ये नाला बांधकामाची लांबी वाढवण्यासह इतर तीन विषय मंजूर करण्यात आले़
सभेत सत्ताधारी काँग्रेस व शिवसेना तसेच विरोधी गटातील भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते़ २० मिनीटात संपूर्ण सभेचे कामकाज पूर्ण करण्यात आले़

Web Title:  In Nandurbar, provision of temporary shelter to the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.