- मनोज शेलारनंदुरबार - दारूच्या नशेत वाळूच्या डंपरने भरधाव चालवून पोलिसांच्या तपासनी नाक्याच्या बॅरीकेट्सला धडक देत पसार झाला. घटनेत ड्युटीवरील कर्मचारी थोडक्यात वाचले. नंदुरबारातील जगतापवाडी तपासणी नाक्यावर ही घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकासह मालकाविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. दिवसासह रात्री देखील वाहनांची तपासणी केली जाते. रात्री वाहने अडविण्यासाठी बॅरीकेट्स लावली जातात. नंदुरबारातील जगतापवाडी चौफुलीजवळ असलेल्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री बॅरीकेटस लावलेले असतांना भरधाव आलेल्या वाळूच्या डंपरने (क्रमांक एमएच ४१-एयू ९६८७) बॅरीकेट्स उडवले. त्यानंतर डंपर तेथून पसार झाले. या ठिकाणी असलेले पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावले. पोलिसांनी नंतर डंपर जप्त केले. याबाबत पोलिस कर्मचारी नरेंद्र चौधरी यांनी फिर्याद दिल्याने चालक राजेंद्र संजय तांबे (४२)रा.चोंडी-जळगाव, ता.मनमाड व ज्ञानेश्वर निवृत्ती केसनोर (५०) रा.मनमाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार राणीलाल भोये करीत आहे.