नंदुरबारात 1350 कोटींचे कर्ज वितरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:42 PM2018-12-20T12:42:19+5:302018-12-20T12:42:24+5:30
नंदुरबार : आगामी खरीप व रब्बी हंगामातील पीक कजर्, कृषी मुदत कर्ज तसेच इतर प्राधान्य क्षेत्र अशा एकुण 1,350 ...
नंदुरबार : आगामी खरीप व रब्बी हंगामातील पीक कजर्, कृषी मुदत कर्ज तसेच इतर प्राधान्य क्षेत्र अशा एकुण 1,350 कोटी रुपयांच्या संभाव्य कर्ज वितरण आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘संभाव्यता युक्त कर्ज योजना’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी.सोमवंशी यांच्या हस्ते व रिझव्र्ह बँकेचे जिल्हा अग्रणी अधिकारी प्रवीण शिनकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक धिरेंद्र बारोत, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, स्टेट बँकेचे ग्रामीण स्वयं रोजगार संस्थाचे संचालक संजय धामणकर, एस.जी.माळोदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक संजय सांगेकर, सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक व महामंडळांचे जिल्हा प्रमुख व संस्थाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
आगामी 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यात कृषी व इतर प्राधान्य क्षेत्रामध्ये कर्ज वाटप करण्यासाठी नाबार्डमार्फत तयार करण्यात आलेला संभाव्य कर्ज वितरण आराखडय़ाचा समावेश पुस्तीकेत आहे. कर्ज आराखडय़ात शेतीपुरक उपक्रम, अन्न प्रक्रिया, फळबाग लागवड, शिक्षण, घरकुलसह इतर क्षेत्रांचाही समावेश आहे.
बँक अधिका:यांनी आपल्या बँकेकडे स्वयंसहायता बचत गट, विविध महामंडळाच्या वतीने सादर झालेल्या प्रकरणांचा शाखानिहाय आढावा घेण्यात आला. ही प्रकरणे प्रलंबीत न ठेवता त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
प्राधान्य क्षेत्रातील कृषी, लघुउद्योग, गृहनिर्माण, स्वयंरोजगार आदी बाबींसाठी पुरेसा कजर्पुरवठा होण्यासाठी प्रत्येक बँकेस देण्यात आलेले उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी बँकांनी प्रय} करावेत. यासाठी डिसेंबर अखेर संपणा:या तिमाहीमध्ये सर्व बँकांनी कर्ज वितरणाचा वेग वाढवावा अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या.
आर.बी. सोमवंशी यांनी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेमार्फत सादर होणारी स्वयंसहायता बचत गटांची कर्ज प्रकरणे तसेच शासनाच्या विविध महामंडळांमार्फत सादर होणा:या कर्ज प्रकरणांविषयी सर्व बँकांनी तातडीने निर्णय घ्यावा अशा सुचना केल्या.
यावेळी बैठकीत भारतीय स्टेट बँक, ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा देखील आढावा घेण्यात आला. बँक अधिकारी यांनी यावेळी दिलेल्या लाभाचा आढावा सादर केला.
यावेळी विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या शाखांचा आढावा देखील सादर केला.