नंदुरबारात नवीन हरभरा व दादरची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:47 AM2019-02-14T11:47:53+5:302019-02-14T11:47:58+5:30
भावही चांगला : येत्या आठवड्यात आवक वाढणार
नंदुरबार : बाजार समितीत सध्या नवीन हरभरा व दादरची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीलाच भाव अनुक्रमे ५,१६२ व ३,२३१ बऱ्यापैकी असल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतकºयांना आता रब्बीकडून थोडीफार अपेक्षा आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी हरभरा व दादरचे पीक घेतले आहे. निसर्गाने साथ दिल्याने हे पीक बºयापैकी आले आहे. हभरा आणि दादरची काढणीनंतर आता ते बाजारात विक्रीस येवू लागले आहे. नवीन दादर व हरभºयाला चांगली मागणी असून भाव देखील चांगला मिळत आहे. नंदुरबार बाजार समितीत मंगळवारपासून रब्बीचा हरभरा आणि दादरची आवक सुरू झाली. हरभरा पीकेव्ही-२ या वाणाला सुरुवातीलाच ५,१६२ रुपये भाव मिळाला आहे. याशिवाय दादरला ३,२३१ रुपये क्विंटल भाव मिळाला. यापुढेही आवक वाढली तरी भाव यापेक्षाही अधीक मिळण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी देखील त्याला दुजोरा दिला. खरीपाने दगाफटका दिला असला तरी रब्बी मात्र बºयापैकी शेतकºयांना हातभार लावत आहे.