नवापूरनजीक रसायनचा टँकरला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:35 AM2017-08-20T11:35:39+5:302017-08-20T11:36:52+5:30
ट्रकची धडक : रस्त्यावर रसायन गळतीमुळे धुर, एकच धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : सुरत-नागपूर महामार्गावरील शहरातील पिंपळनेर चौफुलीवरील वळणावर एचसीएल (हायड्रोक्लोरीक अॅडीस) घेऊन नेणा:या टँकरला ट्रकने धडग दिल्याची घटना रविवारी नऊ वाजेच्या सुमारास घडली़ यानंतर टँकरचे मागील व्हॉल्व्ह तुटल्याने एचसीएल अॅसीड संपूर्ण रस्त्यावर वाहून निघाले होत़े
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरत-नागपूर महामार्गावरील नवापूर नजीकच्या पिंपळनेर चौफुली जवळ असलेल्या वळणाच्या रस्त्यावर एचसीएल (हायड्रोक्लोरीक अॅडीस) वाहून नेणारा टँकरला (क्ऱ जीजे 15 युयु 9995) याला मागून येणा:या ट्रकने (क्ऱ एचआर 55 एन 572) जोरदार धडक दिली़ या अपघातात टँकरच्या मागील बाजूस असलेला व्हॉल्व्ह तुटला़ यामुळे टँकरमध्ये असलेले अॅसिड सर्वत्र पसरल़े महामार्गासह शहरात गॅस लिक झाल्याच्या अफवेने एकच घबराट पसरली होती़ दरम्यान, अॅसीड रस्त्यावर पडलयानंतर त्याचे फ्यूम्स होऊन ते वा:यासह वाहून जात असल्याने परिसरात धुके सदृश्य स्थिती निर्माण झाली होती़