फडणवीस नव्हे, फसवणूक सरकार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:06 PM2017-12-08T14:06:12+5:302017-12-08T14:49:15+5:30
नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, साबीर शेख, आमदार के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, फडणवीस सरकारने शेतकरी, उद्योजक, मजूर यांची फसवणूक चालविली आहे. एकाही आघाडीवर सरकारला यश आलेले नाही. कजर्माफीत शेतक-यांची फसवणूक चालविली आहे. सहा महिने झाले अद्याप एक रुपयाही शेतक-यांना मिळाला नाही. त्यामुळे या सरकारवरील लोकांचा विश्वास कधीचाच उडाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनसामान्यांमध्ये मिसळून सरकारच्या अपयश जनतेसमोर आणावे, असे आवाहन केले.
गुजरात निवडणुकीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले, राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढा धसका घेतला की सलग 50 दिवस पंतप्रधानांना गुजरातमध्ये थांबावे लागत आहे. गुजरात विकासाचे मॉडेल होते तर मग पंतप्रधानांना ही वेळ का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मोदी सरकार आणि फडणवीस सरकारावर टीका केली. प्रस्ताविक व सूत्रसंचलन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरीफ कमर शेख व समाजवादी पार्टीचे अपक्ष उमेदवार दिलावरशा कादरशा यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा चंद्रकांत रघुवंशी यांना पाठींबा जाहीर केला.