लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात येत्या काळात जलयुक्त शिवार योजनेची कामे अधिक प्रभावीपणे राबवायाची असल्यामुळे गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, गावकरी यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. यंदा जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत दुप्पट भाग सिंचनाखाली आणण्याचा संकल्प करावा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नंदुरबारात सोमवारी, जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मृद संधारण विभागाचे संचालक कैलास मोते, विभागीय कृषी संचालक सुभाष नागरे, भुजल सव्र्हेक्षण विभागाचे शास्त्रज्ञ वाघमारे, रोहयो उपायुक्त जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश शिंदे आदी उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू करतांना अगोदर जुने बंधारे, धरणे, नाले यांच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. या कामांसाठी येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील कामांसाठी दोन पोकलॅण्ड मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. समृद्धी जनकल्याण योजनेला महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून येणा:या काळात राज्यात सव्वा लाख विहिरी या योजनेतून पुर्ण करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. या विहिरी पुर्ण झाल्यास जवळपास सहा लाख हेक्टर बागायतीकरण होईल. यावर्षी जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर फळबाग लागवड करावयाची असून या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल. मागेल त्याला शेततळे या योजनेत नवापूर तालुक्यात चांगली कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, पावसाचे पडणारे पाणी आपल्या शिवाराच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.पोपटराव पवार यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला. गावांना स्वयंपुर्ण, दुष्काळमुक्त करावयाचा असून शासनाच्या विविध कामांमध्ये गावक:यांचा पुढाकार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येतात. गावात येणा:या शासकीय योजना म्हणजे गावांचा विकास करण्याच्या संधी असतात. त्या संधीचा फायदा गावक:यांनी घ्यावा. पाण्याची मर्यादा ओळखून पिकांचे व्यवस्थापन करावे. शासनाकडून निधी मिळेल पण काम करण्याची जबाबदारी ही गावातील सर्व शेतक:यांची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाच्या योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सरपंचांनी नेहमीच जागृत राहणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील प्रत्येक गाव हिवरे बाजार झाले पाहिजे यासाठी प्रय} करावा. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. यावर्षी गाव पातळीवर आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी गाव पातळीवरील प्रतिनिधी, शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी दिले. यावेळी जलसाक्षरतेची प्रतिज्ञा देण्यात आली.
गावेच ठरवतील आता कामांचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:09 PM