चार तालुक्यातील दीड लाख शेतकरी दुष्काळनिधीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:51 PM2019-01-30T12:51:37+5:302019-01-30T12:51:57+5:30
कामकाजाला वेग : महसूल मंडळांमध्ये 1 हजार कापणी प्रयोग
नंदुरबार : राज्यशासनाकडून दुष्काळ जाहिर करण्यात आलेले जिल्ह्यातील चार तालुके आणि एका तालुक्यातील दोन मंडळातील 1 लाख 47 हजार शेतकरी दुष्काळ निधीला पात्र ठरणार आहेत़ कृषी विभागाने नुकतेच दीड हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले असून या प्रयोगांचा अहवाल मदतवाटपाचा महत्त्वपूर्ण निकष ठरणार आह़े
राज्यशासनाकडून दुष्काळग्रस्त शेतक:यांसाठी दोन हजार 909 कोटीची मदत जाहिर करण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 203 कोटी 44 लाख रुपयांची मदत मंजूर आह़े यातील 42 कोटी 61 लाख 888 रुपयांचा पहिला हप्ता जाहिर झाला आह़े या हप्त्यातून कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतक:यांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास प्रथम हप्त्यात 6 हजार 800 आणि दुस:या हप्त्यात 3 हजार 400 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आह़े तर बागायती शेतक:यांना 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत देण्यात येणार आह़े बागायती क्षेत्रातील शेतक:यांच्या क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे आणि पीककापणी प्रयोगांचा अहवाल तपासून या कारवाई सुरुवात होणार असल्याने कृषी विभाग आणि पीक विमा करणा:या कंपन्यांकडून तातडीने नंदुरबार जिल्ह्यातील 36 मंडळात कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आले आहेत़ या अहवालानुसार शेतक:यांचे 33 ते 50 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने निष्पन्न होत असल्याने जिल्ह्यातील एकूण 1 लाख 47 हजार खातेदार शेतक:यांना मदतीचे वाटप होण्याची शक्यता आह़े महसूल विभागाकडून शेतक:यांच्या सातबा:यावर नोंदण्यात आलेल्या पिकांचा आढावा घेऊन ही मदत वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े महसूल विभागाकडून शेतक:यांच्या बँक खात्यांवर रक्कम देण्यात येणार असल्याने तलाठींना सूचना करण्यात येऊन शेतक:यांच्या खात्यांचा आढावा घेत कागदपत्रांची पूर्तता करण्याचेही सांगण्यात आले आह़े
एकीकडे सातबाराची नोंद ग्राह्य धरताना दुष्काळानिमित्त येत्या काळात होऊ शकणा:या पंचनाम्यांचे जीपीएस ट्रॅकिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याने ही मदत काहीअंशी लांबवण्याची शक्यताही आह़े परंतू दुष्काळात शेतक:यांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आह़े विशेष म्हणजे शेतक:यांच्या कोणत्याही प्रकारच्या कर्ज किंवा मदतीवर सेवाशुल्कच्या नावाखाली रक्कम कपात करणा:या बँकांना या मदतीतून एक रुपयाही कपात करु नये अशा सूचना आहेत़ 4कृषी विभाग आणि पिक विमा कंपनी यांच्याकडून संयुक्तपणे जिल्ह्यातील 36 महसूली मंडळात 1 हजार 408 ठिकाणी पीक कापणी प्रयोग राबवण्यात आले आहेत़ यात कापूस (कोरडवाहू) 102, कापूस (बागायत) 102, तूर 234, नाचणी 16, सोयाबीन 84, भूईमूग 96, बाजरी (कोरडवाहू) 68, भात 84, ज्वारी 180, उडीद 178, मूग 208 तर मका पिकाचे एकूण 72 प्रयोग करण्यात आल़े यांतर्गत शेतशिवारात पाच वर्षाचे सरासरी उत्पादन आणि चालू हंगामातील उत्पादनाची माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात आला आह़े या प्रयोगांद्वारे शेतकरी पिकविम्यास पात्र ठरणार आह़े तर शासनाने जाहिर केलेल्या दुष्काळनिधीचे वाटप याच प्रयोगांच्या अहवालानुसार करण्यात येणार आह़े
4एकीकडे पीक कापणी प्रयोग हे पाच तालुक्यातील शेतक:यांसाठी वरदान ठरणार असले तरी पीक विमा धारकांची संख्या घटल्याने केवळ 10 हजार शेतक:यांनाच पीक विमा मिळणार आह़े गेल्या खरीप हंगाम 9 हजार कजर्दार तर 1 हजार बिगर कजर्दार शेतक:यांनीच विमा करुन घेतल्याची माहिती आह़े विम्यापोटी शासनाने 45 कोटी 13 लाख रुपयांचा हप्ता भरला होता़ यातून 13 हेक्टर क्षेत्र विम्याखाली आले होत़े