शेतीच्या वादातून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:03 PM2019-06-09T12:03:55+5:302019-06-09T12:04:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीतून वाटा मिळावा यातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना अस्तंबाचा देहमलबारीपाडा, ता.धडगाव येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतीतून वाटा मिळावा यातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना अस्तंबाचा देहमलबारीपाडा, ता.धडगाव येथे 6 रोजी घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माकत्या उग्राण्या वळवी (50) रा. अस्तंबाच्या देहमलबारीपाडा असे मयताचे नाव आहे. माकत्या याच्या नावावर शेती होती. त्या शेतीमधून वाटा मिळावा यासाठी सायसिंग खेमा वळवी याने तगादा लावला होता. त्यातून वाद होऊन सात जणांनी त्याला जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
याबाबत मयताचा मुलगा सुभाष माकत्या वळवी याने फिर्याद दिल्याने सायसिंग खेमा वळवी, बावा गारद्या वळवी, दयानंद खेमा वळवी, खेमा गारद्या वळवी, पिसा बावा वळवी, बाहद्या बावा वळवी, छगन बावा वळवी सर्व रा.अस्तंबाचा देहमलबारीपाडा यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मोरे करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणांवरून हाणामारी व खुनाच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.