केवळ तीन हजार शेतक:यांना मिळाला पिकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:37 PM2019-05-29T12:37:28+5:302019-05-29T12:37:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2018 च्या खरीप हंगामात अवर्षणाचा फटका बसलेल्या केवळ तीन हजार शेतक:यांना शासनाने पीक विमा ...

Only three thousand farmers: they got the benefits of livelihood | केवळ तीन हजार शेतक:यांना मिळाला पिकविम्याचा लाभ

केवळ तीन हजार शेतक:यांना मिळाला पिकविम्याचा लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 2018 च्या खरीप हंगामात अवर्षणाचा फटका बसलेल्या केवळ तीन हजार शेतक:यांना शासनाने पीक विमा मंजूर केला आह़े 10 हजार शेतकरी विम्याच्या परताव्यासाठी पात्र असतानाही केवळ तीनच हजार शेतक:यांच्या खात्यावर रक्कम आल्याने ग्रामीण भागात निराशा व्यक्त करण्यात आली़    
कृषी विभागाकडून 2018 च्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली होती़ यानुसार 31 जुलै 2018 र्पयत जिल्ह्यातील 10 हजार 386 शेतक:यांनी सहभाग घेतला होता़ जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाने हजेरीच न लावल्याने शेतकरी दुष्काळाच्या खाईत ढकलले गेले होत़े यातून जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त ठरले होत़े कालांतराने उर्वरित दोन तालुकेही पैसेवारी  कमी झाल्याने दुष्काळी जाहिर करण्यात आले होत़े यामुळे पीककर्ज घेतांना बँकांकडून सक्तीने                 वसुली होणा:या विम्याच्या रकमेस शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता  होती़ 
कृषी विभागाने जानेवारी अखेरीस पूर्ण केलेल्या पीक कापणी  प्रयोगामुळे शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ 36  मंडळात झालेल्या दीड हजार  कापणी प्रयोगात नुकसानीचे  प्रमाण सर्वाधिक असल्याचे नमूद करत ते 70 टक्क्यांपेक्षा अधिक  असल्याचे म्हटले होत़े यामुळे विमा करणा:या सर्वच शेतक:यांना भरपाईची अपेक्षा होती़ परंतू प्रत्यक्षात कृषी विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारी तीन हजार शेतक:यांचा समावेश झाल्याचे स्पष्ट असून या शेतक:यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम वर्ग करणे सुरु असल्याची माहिती आह़े गेल्या आठवडय़ापासून मिळणारी ही  रक्कम तुटपुंजी असल्याचा दावा शेतक:यांचा असून कर्जातून कपात केलेल्या 10 टक्के रकमेच्या  तुलनेत पिकासाठी हेक्टरी देण्यात येणारा विमा हा वार्षिक उत्पादनापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आह़े 

2018 च्या खरीप हंगामात विविध बँकांकडून कर्ज घेणा:या 10 हजार 386 शेतक:यांनी पीक विमा  करण्यासाठी सहमती दिली होती़ यानुसार त्यांच्या कर्जातून पिकनिहाय रक्कम कपात करत 2 कोटी 51 लाख 20 हजार 666 रुपयांचा विमा हप्ता शासनाकडे वर्ग करण्यात आला होता़ 10 हजार शेतक:यांनी केलेल्या या पिकविम्यातून 1 लाख 33 हजार हेक्टर संरक्षित झाले होत़े अल्पपजर्न्यामुळे प्रत्येक शेतक:यास विमा मिळेल अशी अपेक्षा असताना केवळ 2 हजार 890 शेतक:यांना 5 कोटी 52 लाख 90 हजार 493 रुपयांचा परतावा मिळाला आह़े 36 पैकी केवळ 22 ते 25 मंडळात ही परताव्याची रक्कम मिळाल्याची माहिती असून मंडळनिहाय रक्कम वर्ग करण्याचे कामकाज अद्यापही संथगतीने सुरु असल्याची माहिती आह़े विमा कंपनीकडून शासनाकडे सादर झालेल्या यादीनुसार हे कामकाज केले गेले आह़े शेतक:यांना भरपाई देताना मंडळनिहाय केलेल्या पिक कापणी प्रयोगाचा अहवाल अंतिम मानला गेल्याचे सांगण्यात आले आह़े 

पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पन्नाची माहिती घेत विमा कंपन्यांनी शासनाच्या सहाय्याने परतावा देण्याची कारवाई सुरु केली आह़े जिल्ह्यात विमा मिळालेल्या शेतक:यांना त्यांच्या नुकसानीनुसार भरपाई दिली गेली आह़े शेतक:यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आह़े 
-डॉ़ बी़एऩपाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबाऱ

Web Title: Only three thousand farmers: they got the benefits of livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.