शहाद्यात आरोग्य पथकाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:12 PM2020-04-27T21:12:06+5:302020-04-27T21:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी सुरू केली ...

Opposing the health squad in Shahada | शहाद्यात आरोग्य पथकाला विरोध

शहाद्यात आरोग्य पथकाला विरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी सुरू केली आहे़ सोमवारी या भागातील अब्दुल हमीद चौक, टेकभिलाटी व कुरेशी नगर या भागात वैद्यकीय पथक गेले असता तेथील नागरिकांनी मोठ्या संख्येने पथकाच्या अंगावर धावून येत पथकाला वैद्यकीय तपासणीसाठी विरोध केला.
या वेळी मोठा जमाव जमला होता. विशेष म्हणजे पोलिसांसमोर ही घटना घडल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता माघारी फिरणे पसंत केले. तपासणी करणाºया वैद्यकीय पथकाला विशेष संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. २४ व २५ एप्रिलला प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी या भागातील कंटेन्मेंट व बफरझोन जाहीर केले आहेत. ३० वैद्यकीय पथकामार्फत सुमारे १७ हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी सलग १४ दिवस करण्यात येणार आहे. सोमवारी या कंटेन्मेंट झोनमधील अब्दुल हमीद चौक, कुरेशी नगर व टेकभिलाटी या भागात वैद्यकीय पथक नागरिकांच्या तपासणीसाठी गेले असता सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने जमाव जमला. हा जमाव वैद्यकीय पथकाच्या अंगावर धावून गेला़ यावेळी त्यांच्याकडून तपासणीसाठी मनाई केली. जमाव अंगावर थेट चालून आल्याने पथकातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व कर्मचारी हे प्रचंड घाबरले होते़ काहींनी तेथून माघार घेतली तर बाकीच्यांनी पोलीसांच्या वाहनात आसरा घेतला़
प्रभाग चार मुस्लिम व आदिवासीबहुल दाट वस्तीचा हा भाग आहे. हा सर्व परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये मोडतो. रविवारी रात्री असाच प्रकार गरीब-नवाज कॉलनीमध्ये घडला होता. तेथेही जमावाने आरोग्य पथकाला तपासणी करण्यापासून मज्जाव करत विरोध केला होता़ सोमवारी सलग दुसºया दिवशी वैद्यकीय पथकासोबत असा प्रकार घडल्याने पथकातील कर्मचारी भयभीत झाले असून पुरेशी सुरक्षा व पोलीस संरक्षण मिळाले तरच प्रभाग चारमध्ये तपासणी करु अन्यथा, रुग्णालयातच थांबू असा पवित्रा पथकाने घेतला आहे़
घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नगरसेवक, मशिदीतील मौलाना व सुज्ञ नागरिकांना बोलावून त्यांची तातडीची बैठक घेत कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक असल्याने सर्वांनी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
शहादा येथे सलग दुसºया दिवशी वैद्यकीय पथकासोबत अशोभनीय घटना घडल्याने याचा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून निषेध करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये वैद्यकीय पथकाबाबत गैरसमज, अफवा पसरविणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रभाग क्रमांक चारमध्ये जीवाला धोका असून केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच बचावलो आहोत. वैद्यकीय कर्मचारी कुटुंब घरदार सोडून नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत आहेत़ कोणत्याही नागरिकाला कोरोना विषाणूचे संक्रमण होणार नाही याची खबरदारी आरोग्य पथक घेत आहे़ यामुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे़ परंतू याउलट प्रभाग चारमध्ये जमाव जमतो, अरेरावीची भाषा केली जाते, आम्हाला आमच्या कर्तव्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही अशी अगतिकता एका आरोग्य कर्मचाºयाने ‘लोकमत’ जवळ बोलून दाखवली़

Web Title: Opposing the health squad in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.