मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणा:या विविध उपक्रम आणि प्रय} देखील तोकडे पडल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा टक्के निकाल कमी लागला आहे. दरम्यान, मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी कायम आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीची गुणवत्ता राज्यात सर्वात कमी आहे. देश पातळीवरील ‘असर’ या संस्थेच्या सव्र्हेत देखील ती बाब स्पष्ट झाली आहे. गुणवत्ता वाढीसाठी प्रय} होणे आवश्यक असतांना त्या पातळीवर मात्र आलबेल असल्याचेच दिसून येते. याच कारणामुळे दहावीचा निकालाची टक्केवारी तर घसरली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकुण 19, 935 विद्यार्थी प्रवीष्ठ झाले होते. त्यापैकी 14,840 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी 20,431 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 16,497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी टक्केवारी 80.74 टक्के होती. विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणा:यांची संख्या यंदा अवघी 2,770 इतकी आहे. गेल्यावर्षी 3,255 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. प्रथम श्रेणीत यंदा 7,771 विद्यार्थी आले. गेल्यावर्षी 8,313विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदा टक्केवारी घसरण्याचे कारणाबाबत मात्र शिक्षण क्षेत्रात मतभिन्नता आहे. कुणी म्हणते गुणवत्ता घसरली, कुणी नवीन अभ्यासक्रमाकडे बोट दाखवत आहे. तर कुणी शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाला दोष देत आहेत.नुकत्याच लागलेल्या 12 वीच्या निकालात देखील टक्केवारी घसरलेली दिसून आलेली आहे. यामुळे आता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि या क्षेत्रात काम करणा:यांनी मंथन करणे आवश्यक आहे. केवळ शाळा काढून आणि तुकडय़ा वाढवून उपयोग नाही. निकालाची टक्केवारी वाढविणे देखील आवश्यक आहे. दुसरीकडे खरोखर शिक्षणाची गंगा विद्याथ्र्यार्पयत पोहचविणा:या शाळा देखील आहेत. अशा शाळांचा निकाल देखील 100 टक्के लागलेला आहे. या शाळांची जिल्ह्यातील संख्या 14 आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच आहे. एकुणच घसरलेल्या निकालाच्या टक्केवारीबाबत आता विविध बाजू ऐकण्यास मिळत आहेत. यापुढे आता जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी, गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रय} व्हावे. शाळांनी देखील गुणवत्ता सुधारसाठी प्रय} करावा अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
यंदापासून तोंडी परीक्षेचे मार्क देण्याची पद्धत बंद करण्यात आली. त्यामुळे टक्केवारी घसरल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षार्पयत तोंडी परीक्षेचे मार्क शाळांच्या हातात होते. त्यामुळे मुलांच्या गुणांमध्ये मोठी वाढ दिसून येत होती. यंदा तोंडी परीक्षेचे मार्क काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे लेखी परिक्षेवरच विद्याथ्र्याना भर देवून त्यावरच गुण मिळवावे लागले आहेत. त्याचा परिणाम यंदा झाल्याचाही एक मतप्रवाह दिसून येत आहे.