बदलत्या पेट्रोल दरांनी सर्वसामान्यांना फटका : नंदुरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:27 PM2018-01-23T17:27:47+5:302018-01-23T17:27:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या सहा महिन्यात पेट्रोल व डिङोलच्या दरात 10 ते 20 पैशांनी सतत वाढ होत आह़े त्यामुळे याचा फटका सर्वाधिक ग्राहकांना बसत आह़े त्यामुळे शासनाने पेट्रोलच्या दरात स्थिरता आणावी व पेट्रोलपंप चालक व ग्राहकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा पेट्रोलपंप चालकांकडून व्यक्त करण्यात आला़
नंदुरबार शहरात साधारणत 10 पेट्रोलपंप आहेत़ मंगळवारी सर्वत्र पेट्रोलपंपावर पेट्रोलचे दर हे सरासरी 81 रुपये 28 पैसे तर डिङोलचे दर 68 रुपये 35 पैसे प्रती लीटर होत़े नंदुरबार शहरात दररोज सुमारे 28 हजार लीटर पेट्रोलची गरज भासत असत़े पेट्रोलीयम मंत्रालयाकडून दररोज पेट्रोलच्या भावात बदल करण्यात येत असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े शिवाय, नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोलचे दर हे राज्यात सर्वाधिक असल्याचेही माहिती आह़े ‘सेस’ मुळे लीटरमागे अधिकच्या दीड रुपयांचा बोजा नंदुरबारकरांना सहन करावा लागत आह़े त्यामुळे केंद्राच्या आगामी बजटमध्ये पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आह़े