बोरवान येथील देवमोगरा मातेच्या यात्रेला उत्साहात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:10 PM2018-02-19T12:10:08+5:302018-02-19T12:10:13+5:30

भाविकांची गर्दी : सोंगाडय़ा पार्टीचे खास आकर्षण

The pilgrimage begins with the enthusiasm of Devmogra maternal pilgrimage in Borwan | बोरवान येथील देवमोगरा मातेच्या यात्रेला उत्साहात सुरुवात

बोरवान येथील देवमोगरा मातेच्या यात्रेला उत्साहात सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील बोरवान येथील देवमोगरा मातेच्या यात्रोत्सवाला रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली़ पहिल्याच दिवशी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केल्याचे दिसून आल़े रात्री उशिरार्पयत दर्शनासाठी येणा:या भाविकांची वर्दळ सुरुच होती़
महाशिवरात्रीच्या पाच दिवसानंतर बोरवान येथील देवमोगरा मातेची यात्रेला प्रारंभ करण्यात येत असतो़ गेल्या 45 वर्षापासून यात्रा दरवर्षी भरविण्यात येत असत़े विशेष म्हणजे या यात्रोत्सवाला येणा:या भाविकांची संख्या दरवर्षी वाढतच असल्याचे दिसून येत आह़े हाच उत्साह व चैतन्य यंदाही कायम आह़े सकाळी महापुजा व प्रसादाचे वाटप करुन यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली़ या वेळी परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या कान्याकोप:यातून मोठय़ा संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी उपस्थित होत़े सकाळी विधिवत पुजा, तसेच मातेला साजश्रृंगार अर्पण करण्यात आल़े 
भाविकांचे श्रध्दास्थान.
गेल्या 45 वर्षापासून हा यात्रोत्सव भरवण्यात येत असतो़ याबाबत जुन्याजाणत्यांकडून एक दृष्टांत सांगण्यात येतो़ 
बोरवान येथील पुजारी दिवाकर ठाकरे यांना देवमोगरा मातेने स्वप्नात दृष्टांत दिल्यापासून सुमारे 45 वर्षापासून हा यात्रोत्सव दरवर्षी सुरु करण्यात आला आह़े मातेने स्वप्नात आपणास दृष्टांत दिला तसेच महाशिवरात्रीनंतर पाच दिवसांनी आपला यात्रोत्सव भरवण्यात यावा अशीच मातेची इच्छा असल्याचे गृहित धरुन हा यात्रोत्सव सुरु करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत़े 
दरम्यान, ब्रिजलाल ठाकरे हे पुजारी म्हणून आपल्या वडीलांचा वारसा पुढेही कायम ठेवत आहेत़  धनपूर धरणाचे बांधकाम झाल्यानंतर धनपूर-बोरवान रस्ता बंद आह़े त्यामुळे यातून भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आल़े भाविकांना धनपूर-राणीपूर-बंधाराव-खर्डी मार्गे बोरवान यात्रेस यावे लागल़े
नवसाला पावणारी माता
यात्रेमध्ये दरवर्षी नवस फेडणा:यांची मोठी गर्दी असत़े यासाठी जिल्हाभरातून भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात़ भाविकांची गर्दी लक्षात घेता आयोजकांकडूनही गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आह़े 
 

Web Title: The pilgrimage begins with the enthusiasm of Devmogra maternal pilgrimage in Borwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.