पोलीस दादाच सांगे आम्ही अॅड होणार ही ‘अफवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:15 PM2018-07-14T13:15:06+5:302018-07-14T13:15:06+5:30

सायबर सेल : अफवा रोखण्यासाठी जनजागृतीवर पोलीस दलाचा भर

Police say we will call 'rumor' | पोलीस दादाच सांगे आम्ही अॅड होणार ही ‘अफवा’

पोलीस दादाच सांगे आम्ही अॅड होणार ही ‘अफवा’

Next

नंदुरबार : अनोळखींना मारहाण झाल्याच्या घटनांनंतर राईनपाडा ता़ साक्री येथे पाच भिक्षुकांची हत्या झाली होती़ वाढत्या अफवा रोखण्यासाठी पोलीसांनी जनजागृती सुरू केली होती़ याच दरम्यान ‘व्हॉटस अॅप’ ग्रुपवर पोलीस दादा अॅड होणार अशा पोस्ट सुरू झाल्या होत्या़ परंतू अशा प्रकारचा कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे सायबर सेलकडून सांगण्यात आले आह़े यामुळे ही पोस्ट अफवा ठरली आह़े  
पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन अर्थात व्यक्ती ते व्यक्ती संवाद साधण्याचे माध्यम म्हणून व्हॉटस अॅप या सोशल मिडियाचा वापर करण्यात येतो़ गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणा:या टोळीच्या अफवा पसरल्याने अनोळखी व्यक्ती आणि भिक्षुकांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या होत्या़ या घटनांना अटकाव व्हावा म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीवर भर देण्यात आला होता़ बहुतांशी यशस्वी झालेल्या या मोहिमेत काही दिवसांपूर्वी पोलीसही त्या-त्या व्हॉटस अॅप ग्रुपला अॅड होणार असा मेसेज फिरवण्यात येत होता़ ब:यापैकी व्हायरल झालेल्या या मेसेजमुळे एकच चर्चा सुरू झाली होती़ सुरू असलेली ही चर्चा आता सायबर सेलकडूनच थांबवण्यात आली असून ‘आम्ही अॅड होणार’ ही सुद्धा अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आह़े 
जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने व्हॉटसअॅप ग्रुप्स असून किमान 4 लाखांच्या जवळपास युजर्स त्यात समाविष्ट आहेत़ या सर्व युजर्स अर्थात मोबाईल ग्राहकांकडून सातत्याने फिरवल्या जाणा:या पोस्टवर नजर ठेवून त्यांची तपासणी करण्यासाठी लागणारी  योग्य साधने आणि एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील डाटा कव्हर करण्यासाठी तेवढय़ाच क्षमतेचे सव्र्हर उपलब्ध नाहीत़ 
सायबर सेलकडून केवळ एखादी वादग्रस्त पोस्ट प्रकाशित झाल्यानंतर तिची चाचपणी करत तिचे संकलन केले जात़े एकीकडे व्हॉटस ग्रुप्सबाबत पोलीस अॅड होणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी दुसरीकडे फेसबुक, ईन्स्टाग्राम आणि इतर ओपन समाजमाध्यमांवर मात्र पोलीसांची करडी नजर राहणार आह़े समाजात तेढ निर्माण करणा:या, भावना भडकावणा:या, अफवा फैलावणा:या पोस्ट वेळावेळी पाहून त्यांची तपासणी होणार आह़े सायबर सेलकडून केल्या जाणा:या या कामकाजामुळे समाजकंटकांवर वचक निर्माण होणार आह़े यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाही अबाधित ठेवण्यास मदत होणार आह़े  
अफवा रोखण्यासाठी पोलीस दलाकडून अद्यापही जनजागृती सुरू असून पोलीस ठाण्यांद्वारे नागरिकांना माहिती दिली जात आह़े अनेक ठिकाणी जनजागृतीपर फलक लावून माहिती दिली जात आह़े  
 

Web Title: Police say we will call 'rumor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.