गुजर समाज सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी : 18 फेब्रुवारीला निझर येथे सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:05 PM2018-02-14T12:05:05+5:302018-02-14T12:05:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व गुजर समाज मंचतर्फे निझर (गुजरात) येथे होणा:या सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी तब्बल सात एकर जागेत दीड लाख स्क्वेअर फुटचा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. सुमारे 15 हजार लोकांची भोजन व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारीला नियोजित मुहूर्तावर हा लगAसोहळा पार पडेल.
गुजर समाज मंचतर्फे निझर येथे सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यासाठी निझर येथील कार्यकर्ते तथा गुजर मंचचे सदस्य या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत. विशेषत: गुजर समाजात सामूहिक विवाह सोहळ्याची प्रथा नव्हती. गेल्यावर्षी विविध शहर ग्राम गुजर मंडळाने प्रकाशा येथे पहिला सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यातील प्रतिसाद पाहता या वर्षापासून दोन टप्प्यात सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. पहिल्या टप्प्यात गुजर समाज मंच व निझर येथील समाज बांधवांनी 18 फेब्रुवारीला हा सोहळा घेतला आहे. त्यासाठी तब्बल 23 जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. विनामूल्य हा विवाह सोहळा होणार आहे. विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांसाठी प्रत्येकाला स्वतंत्र विधीसाठी ब्राrाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाज प्रथेप्रमाणे सर्व विधी संयोजकांनी करून देण्याची सुविधा केली आहे. विशेषत: या विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांसाठी दात्यांतर्फे वधू-वरांसाठी पोशाख, ब्युटीपार्लरची सुविधा, फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग यासह अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोहळ्याला सुमारे 15 हजार समाज बांधव उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भोजनाची व इतर व्यवस्था आयोजकांनी केली आहे. त्यासाठी निझर येथील आर.जी. पाटील विद्यालयालगतच्या सात एकर जागेत मंडप उभारणी सुरू आहे. एकूण दीड लाख स्क्वेअर फुटचा मंडप उभारण्यात येत असून त्यात भोजन व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे.