अंगठे मॅच होण्याची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:45 AM2017-09-18T10:45:28+5:302017-09-18T10:45:28+5:30

कर्ज मुक्तीचे ऑनलाईन अर्ज : पाच हजार शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता

The problem of thumb affusion becomes permanent | अंगठे मॅच होण्याची समस्या कायम

अंगठे मॅच होण्याची समस्या कायम

Next
ठळक मुद्दे पाच दिवसात जास्तीत जास्त अर्ज भरणार.. येत्या पाच दिवसात जास्तीत जास्त शेतक:यांचे कजर्मुक्ती संदर्भातील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रय} करण्यात येणार आहे. त्यासाठी संबधित महाईसेवा केंद्र, आपले सरकार या केंद्र चालकांना सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंध

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतकरी कजर्मुक्तीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली असली तरी सव्र्हर डाऊनची समस्या कायमच आहे. शिवाय जवळपास पाच हजार शेतक:याचे बायोमेट्रीक अंगठे मॅच होत नसल्यामुळे असे शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आतार्पयत 73 हजार शेतक:यांनी नोंदणी करून 49 हजार शेतक:यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड झाले आहेत. 
शेतकरी कजर्मुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतक:यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 15 सप्टेंबर देण्यात आली होती. परंतु 14 रोजी रात्री ही मुदत 22 सप्टेंबर्पयत वाढविण्यात आल्याचे शासनाने जाहीर केले होते. ही बाब ग्रामिण भागात माहिती न झाल्याने 15 रोजी शेवटची मुदत समजून शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर महाईसेवा केंद्रात गर्दी केली होती. 
कजर्मुक्तीसाठी जिल्ह्यातील 73 हजार शेतक:यांनी आतार्पयत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास 49 हजार शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज अपलोड झालेले आहेत. मुदतवाढ मिळाल्याने त्यात आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
विविध अडचणी कायम
शेतक:यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात बायोमेट्रीक अंगठा मॅच होत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. असे जवळपास चार ते पाच हजार शेतकरी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. असे शेतकरी या योजनेपासून वंचीत राहू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय ग्रामिण भागात कनेक्टीव्हिटीला देखील मोठय़ा प्रमाणावर अडचणी येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी दिवसभर शेतक:यांना वाट पहात बसावे लागत होते. ग्रामपंचायतींच्या ठिकाणी जेथे सोय करण्यात आली होती तेथे फारच कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. एकतर भारनियमनाचा त्रास शिवाय ग्रामिण भागात इंटरनेटसेवा मिळत नसल्याचा परिणाम यामुळे ग्रामपंचायतीधील केंद्र सहसा बंदच राहत होती.
मुदतीवाढीमुळे दिलासा
ऑनलाईन अर्ज भरण्यास आता सात दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने वंचीत राहणा:या अनेक शेतक:यांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी आणखी किमान तीन ते चार हजार शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज अपलोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुदतीअंती पुर्ण
मुदतीअंती नोंदणी केलेल्या सर्वच शेतक:यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने    नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले. 
आणखी पाच दिवस असल्यामुळे शेतक:यांची महा ईसेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रात अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने संबधितांना नियोजन करण्याच्या सुचना देणे आवश्यक ठरणार       आहे.

Web Title: The problem of thumb affusion becomes permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.