योजना राबविण्यात येताय अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:50 PM2017-09-19T12:50:12+5:302017-09-19T12:50:12+5:30

तळोद्यातील पशुपालकांच्या व्यथा : केवळ तीन पशुवैद्यकीय अधिकारी

 Problems implemented in the scheme | योजना राबविण्यात येताय अडचणी

योजना राबविण्यात येताय अडचणी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिका:यांच्या मंजुर आठ जागांपैकी पाच जागा रिक्त आहेत़ त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा कारभार केवळ तीन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या खांद्यावर आह़े याचा परिणाम म्हणून पशुपालकांच्या विविध अडचणी, शिबीरे घेणे आदी कामांमध्ये याचा परिणाम दिसून येत आह़े 
पशुवैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त जागांचा सर्वाधिक फटका तळोदा तालुक्यातील बोरद व मोड   येथील पशुपालकांना बसत असल्याचे दिसून येत आह़े  बोरद व मोड मिळून 28 गावे  पशुवैद्यकीय अधिका:यांपासून वंचित आहेत़ त्यामुळे पशुपालकांना व्यवस्थित मार्गदर्शनही मिळत नसल्याच्या व्यस्था पशुपालकांकडून मांडण्यात येत आहेत़ संपूर्ण तालुक्यात केवळ मोड, मोदलपाडा व कोठार याच ठिकाणी पशुवैद्यकीय अधिका:यांची पदे भरण्यात आली आहेत़ तर उर्वरीत प्रतापपूर, सोमावल, बोरद,  तळोदा पंचायत समिती, तालुका  लघु पशु चिकित्सालय तळोदा या ठिकाणी        पशुवैद्यकी अधिकारी नसल्याने पशुपालकांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत़ याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांकडून अधिकारी वर्गाची भेट घेण्यात आली़ तसेच  रिक्त जागा त्वरीत भरण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आह़े परंतु  याकडे वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने हा  प्रश्न प्रलंबितच राहत आह़े  त्यामुळे याचा नेहमीच पशुपालकांना त्रास होत असतो़ सध्या पावसाळा असल्याने संक्रमनाचे दिवस  असतात़ त्यामुळे या दिवसांमध्ये दुभती जनावरे यांना विविध  रोगांची बाधाही होत असत़े परंतु पशुवैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त जागांमुळे पदावर कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिका:यांना सर्व तालुक्याला न्याय देता येणे  शक्य नसत़े परिणामी पशुपालक योग्य मार्गदर्शनापासून वंचित  राहत असतात़ 
संपूर्ण तालुक्यात केवळ तीनच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत़ त्यामुळे ब:याच गावांचा अतिरिक्त कार्यभार या तीन पशुवैद्यकीय अधिका:यांना सांभाळावा लागत असतो़ त्यामुळे साहजिकच याचा कामावर प्रचंड परिणाम जाणवत असतो़ वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या कित्तेक वर्षापासून या रिक्त  जागा भरल्या गेल्या नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरीत रिक्त जागा भरण्याची मागणी आह़े

Web Title:  Problems implemented in the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.