मयत शिक्षकाच्या वारसांना मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:21 PM2019-10-29T12:21:54+5:302019-10-29T12:22:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : मागील विधानसभा निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले प्राथमिक शिक्षक स्व.किसन नाईक यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : मागील विधानसभा निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले प्राथमिक शिक्षक स्व.किसन नाईक यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी लढा शिक्षक संघटनतर्फे करण्यात आली.
निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मोरंबा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपशिक्षक किसन लालसिंग नाईक यांना चक्कर आली होती. ते सन 2016 पासून उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची त्याच गावात निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. नाईक हे दि.20 ऑक्टोबरला नेमुन दिलेल्या मतदार संघातील मतदारांना चिठ्ठय़ा वाटप करतांना त्यांना हृदयविकाराचा धोका जाणवू लागला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात नमुद केले आहे. त्यांच्या कुटुंबाला निवडणूक आयोगामार्फत आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी लढा शिक्षक संघटनेने केली. निवेदनावर लढा शिक्षक संघटनेचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रामजी पाडवी, नुरसिंग पाडवी, सायसिंग वसावे, विजय वसावे, छात्रसिंग वळवी, संजय वळवी, दशरथ पाडवी, अरुण पवार यांच्या सह्या आहे.