काकर्दे : नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे संत सावता माळी भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भजन-किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े याअंतर्गत विविध सामाजिक विषयांवर भजनी मंडळाकडून जनजागृती करण्यात आली़हभप किर्तनकार प्रतिभाबाई सोनगीर यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करुन विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल़े या वेळी संत सावता माळी भजनी अखिल वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष व भजनी मंडळाचे अध्यक्ष यदु आनंदा माळी उपस्थित होत़े काकर्दे ता़ नंदुरबार येथै अखंड हरिपाठ, आरती, भजन किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होत़े या वेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, आजची तरुण पिढी व्यसनामुळे वाट भरकटली आह़े त्यामुळे त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणायचे असेल तर त्यांना याचे दुष्परिणाम सांगणे गरजेचे ठरेल़ गावात दारु तयार करणे व विक्री करण्यास विरोध करायला हवा, यासाठी विशेषत महिलांनी पुढाकार घेत पुढील पिढी वाया जाण्यापासून रोखावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली़ मुलीच्या जन्माचे स्वागत करा, पाण्याचा जपून वापर करा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, आरोग्याची काळजी घ्या आदी विविध सामाजिक विषयांवर भजन-किर्तनाव्दारे मार्गदर्शन करण्यात आल़े
नंदुरबारातील काकर्दे येथे भजन-किर्तनाव्दारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:50 PM